वसमत/ इसाक पठाण
तालुक्यातील कुरुंदा येथे ढगफुटी सदुश्य पावसाने प्रचंड नुकसान झालेल्या व बेघर झालेल्या नागरिकांना मदत व दिलासा देऊन त्यांचे अश्रु पुसण्यासाठी जमियत उलमा ए हिंद चे प्रदेशाध्यक्ष मौलाना हाफीज नदीम सिद्धीकी यांनी कुरुंदा येथे भेट दिली तसेच शासन स्तरावर पाठपुरावा करून बेघरांना कायमस्वरूपी घरकुल मिळावे यासाठी प्रयत्न केले जाईल असे आश्वासन दिले
वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे 9 जुलै रोजी आलेल्या पुरामुळे 80 टक्के घरे पाण्याखाली गेलेत तर 25 ते 30 जण बेघर झाले आहेत,कुरुंदा येथील पूरग्रस्त लोकांची पाहणी करण्यासाठी जमियत उलेमा हिंदचे प्रदेशाध्यक्ष मौलाना हाफीज नदीम सिद्धीकी हे शनिवार दिनांक 16 जुलै रोजी कुरुंदा येथे आले होते, त्यांनी पाहणी करून बेघर लोकांच्या घरकुलसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले ,यावरही प्रश्न न सुटल्यास जमियत उलेमा हिंदच्या वतीने त्यासाठी पुढाकार घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.
कुरुंदा येथे या पूर्वीही 2016 मध्ये महापुर आला होता त्यावेळेस देखील जमियत उलेमा हिंद गावकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आली होती ,त्यांनी त्यावेळेस मोठी मदत केली होती, सामाजिक उपक्रम म्हणून मुस्लिम समाजासाठी सामुहिक विवाह सोहळा आयोजित केले होते,
यावेळे आलेल्या महापुराच्या मदतीसाठी देखील जमियत उलेमा हिंद धावून आली जमेल ती मदत केली.
पूरग्रस्त आता सावरण्याचा मार्गावर असून बेघर झालेल्या 25 ते 30 लोकांचा प्रश्न निर्माण झाला आहे त्या दुष्टीकोणातून जमियत उलेमा हिंदचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मौलाना हाफीज नदीम सिद्धकी , परभणी ज़िला अध्यक्ष मौलाना सादिक नदवी,हिंगोली जिला अध्यक्ष मौलाना मोबीन सिद्दीकी ,वसमत शहर अध्यक्ष मोलाना जमील, आदींनी पाहणी केली
जे लोक बेघर झाले आहे त्यांना घर कसे निर्माण करता येईल यासाठी अगोदर प्रशासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल त्यात यश न आल्यास जमियत उलेमा हिंद पुढाकार घेईल असे यावेळी मौलाना हाफीज नदीम सिद्धीकी यांनी सांगितले.
यावेळी गावातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.








