हिंगोली : इसाक पठाण
हिंगोली शहरातील माणिक स्मारक आर्य विद्यालयातील इयत्ता १० वी च्या वर्ग मित्रांचे स्नेहसंमेलन कोरोनाच्या संकटानंतर प्रथमच घेण्यात आले. यावेळी अनेक वर्ग मित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
मागील दोन वर्षापूर्वी देशभरात कोरोनाचे भयावह संकट होते. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध प्रशासनाने घातले होते. अशा परिस्थतीत नागरीकांनी देखील प्रशासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन केले. माणिक स्मारक आर्य विद्यालयातील सन १९९१ – ९२ मधील इयत्ता १० वी मधील वर्ग मित्रांनी मागील काही वर्षापासून स्नेहसंमेलन घेण्याचा पायंडा घातला आहे. परंतू मध्यंतरी कोरोनाचे संकट असल्याने हे स्नेहसंमेलन घेण्यात आले नव्हते. सध्या कोरोनाचा जोर ओसरल्याने सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यानिमित्ताने वर्ग मित्रांचे स्नेहसंमेलन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानूसार २४ जुलैला लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीमधील प्रादेशिक परिवहन कार्यालय शेजारी वर्गमित्रांचे स्नेहसंमेलन घेण्यात आले. या स्नेह संमेलनात भारता बाहेरील व इतर मोठ्या शहरातील अनेक वर्ग मित्र स्नेहसंमेलनात सहभागी झाले होते. स्नेहसंमेलनात अनेकांनी आपआपला परिचय दिल्या नंतर जून्या आठवणींना उजाळा दिला. बर्याच वर्षानंतर अनेक वर्ग मित्र एकमेकांना भेटल्यामुळे त्यांचा आनंद व्दिगुणीत झाला. या स्नेहसंमेलनात बहेरीन येथून आलेले चंद्रशेखर विडोळकर यांच्यासह नवी मुंबई येथील मनोहर मुंदडा, कोकणामधून भागोराव बासंबेकर, संदेश घुगे, मनिष राठौर, अमित चांडक, तय्यब अली, सचिन कुलकर्णी, मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू उर्पâ प्रमोद कुटे, राम घुगे, अनिल गव्हाणकर, पंकज गुंडेवार, मनोज डोड्या, मनोज शुक्ला, राजेश मुदिराज, सुधीर गोगटे, संतोष बनसोडे, जगदिश मुदिराज, डॉ. हरिष ऋषि, गजू पवार, रायचंद जैन, रुपेश गौंड, सतिष चव्हाण, गिरीष गुंडेवार, वैâलास राजूलवार, गोपाल अग्रवाल, पवन व्यास, शिवाजी घुगे, महेंद्र अग्रवाल, संजय लदनिया, काशिनाथ गवळी, संजय महाजन, राजेश मुदिराज, पंढरीनाथ पाटणकर, अंकुर मोकाटे आदींनी सहभाग नोंदविला. दिवसभरात या वर्गमित्रांनी अनेक कार्यक्रम घेऊन स्नेहसंमेलन यशस्वी पार पाडले.








