बदनापूर / प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट संचलित बदनापूर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पाथ्रीकर कॅम्पस येथे आंतर महाविद्यालयीन कब्बडी (मुले ) स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत बदनापूर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यलयाच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी बजावत कन्नड येथील शिव छत्रपती महाविद्यालय संघावर ३१ गुणांनी मात्र करून प्रथम क्रमांक पटकाविला आहे ,या स्पर्धेत २० कब्बडी संघानी सहभाग नोंदविला होता . विशेष म्हणजे विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच कब्बडी स्पर्धा मॅट वर खेळविण्यात आले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट संचलित बदनापूर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन कब्बडी (मुले ) स्पर्धा पाथ्रीकर कॅम्पस मध्ये ११ व १२ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या होत्या या स्पर्धेचे उदघाट्न जालना जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्या हस्ते करण्यात आले ,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.दत्ताभाऊ पाथ्रीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी क्रीडा संचालक डॉ.द्यानंद कांबळे,औरंगाबाद क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे हे उपस्थित होते यावेळी आयोजक संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ.देवेश पाथ्रीकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले.तर १२ नोव्हेंबर रोजी अंतिम सामना बदनापूर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व कन्नड येथील शिव छत्रपती महाविद्यालय संघ दरम्यान झाला यावेळी बदनापूर संघाने ३७ गुण मिळविले तर कन्नड संघाने १४ गुण मिळविले असता बदनापूर संघाने २३ गुणांनी विरोधी संघावर मात करीत प्रथम विजेता ठरल्याचे पंचानी घोषित केले.
बदनापूर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्या डॉ.एम.डी. पाथ्रीकर,संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ.देवेश पाथ्रीकर यांच्या मार्गदर्शनखाली शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ.शेख एस.एस, विभाग प्रमुख डॉ.खान नाजमा,डॉ. एस.डी.लांडे यांनी कब्बडी स्पर्धेचे आयोजन केलेले होते या स्पर्धेत जालना,औरंगाबाद जिल्ह्यातील २० कब्बडी संघानी सहभाग नोंदविला असून दोन दिवस ह्या स्पर्धा सुरु होत्या ,विशेष म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच कब्बडी स्पर्धा मॅट वर खेळविणायत आल्या ,स्पर्धेचा समारोप जालना जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बदनापूरचे आमदार नारायण कुचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर समारोप अध्यक्षाथांनी संस्थेचे अध्यक्ष डॉ.दत्ताभाऊ पाथ्रीकर होते यावेलो व्यवस्थापकीय संचालक डॉ.देवेश पाथ्रीकर यांनी पालकमंत्री डॉ.सावे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला ,कार्यक्रमाचे सूत्र संचलन डॉ.देशमुख देवेंद्र यांनी केले तर प्रास्ताविक शारीरिक शिक्षण संचालक डॉ.एस.एस.शेख यांनी केले यांनी केले.
बक्षीस वितरण
बदनापूर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या इनडोअर स्टेडियम मध्ये ११ व १२ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन कब्बडी (मुले ) स्पर्धेत २० संघानी सहभाग घेतला होता अंतिम सामना बदनापूर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय तसेच कन्नड येथील शिव छत्रपती महाविद्यालय दरम्यान झाला असून प्रथम व दिवतीय आलेल्या संघाला जाळं जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.अतुल सावे तसेच बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते सत्कार करून स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रॅशेखर घुगे, डॉ. एम. ए. बारी, डॉ. प्रसाद मदन, डॉ. आत्ताउल्ला जहागीरदार हे उपस्थित होते.
या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी डॉ.राहुल हजारे,डॉ.राजळे विजय,डॉ.मुंढे अशोक,डॉ.गावंडे गणेश,डॉ.निकाळजे जीवनज्योती,डॉ.साल्मन शेख, सिद्धार्थ मुणगे,डॉ.रामदास निहाल,डॉ.शफी शेख,डॉ.दिंडे सुधीर आदींनी परिश्रम घेतले तर यावेळी शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने विविध क्षेत्रात नोकरीस लागलेले विशेष म्हणजे पोलीस खात्यात विविध पदावर कार्यरत असलेले माजी विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच राष्ट्रीय खेळाडू डॉ.माणिक राठोड यांचा देखील पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला,या स्पर्धेसाठी पंच म्हणून डॉ.भुजंग डावकर,डॉ.प्रशांत तौर, ,संतोष नागवे,राजू थोरात, पाटोळे, रवी ढगे, उदय काकडे,डॉ. वसंत झेंडे, डॉ. आर. पी. राठोड, डॉ. नेताजी मुळे. डॉ. राणी पवार, डॉ के. डी. दापके, डॉ. सुरेश नरवडे, डॉ. रामदास जाधव यांनी काम पहिले, कार्यक्रमास शहरातील नागरिक, आदी सह तालुक्यातील सरपंच ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







