बदनापूर
अनेक जण समाजसेवा म्हणून मोफत आरोग्य ,नेत्र तपासणी शिबिरे घेत असतात परंतु आरोग्य ,नेत्र तपासणी नंतर रुग्णांना औषधी,शास्त्रक्रया व येण्या जाण्याचा खर्च स्वतःच करावा लागतो त्यामुळे त्या मोफत शिबिरांचा लाभ खऱ्या अर्थाने रुगांना मिळत नाही मात्र निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टच्या बदनापूर न्यू लाईफ केअर हॉस्पिटल व चिकलठाणा लायन्स नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे अध्यक्ष डॉ.देवेश पाथ्रीकर यांनी बदनापूर मतदार संघात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यास सुरवात केलेली असून रुग्णांना येण्या जाण्यापासून ते औषधी व शस्त्रक्रिया तसेच जेवणाची व्यवस्था त्यांनी स्वतः करून एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतलेला असून २४ जानेवारी रोजी दगडवाडी येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले या शिबिरात १८८ रुग्नांची तपासणी करण्यात आली.त्यामध्ये ५३ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
अनेक सामाजिक संस्था किंवा दवाखाना चालक मोफत आरोग्य,नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करून केवळ मोफत तपासणी करून रुग्नांचे रोग निदान करतात तद्नंतर रुगांना जालना किंवा औरंगाबाद येथे दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावे लागते तेव्हा येण्या जाण्याच्या खर्चासाहित औषधी,शस्त्रक्रिया ,दवक्षणायत राहण्याचा खर्च व हॉटेलचे जेवण हा सर्व खर्च स्वतः रुगांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना कारवाया लागतो त्यामुळे मोफत आरोग्य किंवा नेत्र तपासणी शिबिरांचा खऱ्या अर्थाने काहीच फायदा रुग्णांना होत नाही अश्या परिस्थितीत रुग्नांचे आतोनात हाल होतात, त्यामुळे निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट संचलित बदनापूर न्यू लाईफ केअर हॉस्पिटल व चिकलठाणा लायन्स नेत्र रूगनलाय यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे अध्यक्ष डॉ. देवेश पाथ्रीकर यांनी रुग्नांची खरी अडचण लक्षात घेऊन बदनापूर तालुक्यात मागील दोन वर्षांपासून मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन प्रत्येक गावात सुरु केले आहे ,गावात वैधकीय अधिकारी व कर्मचारी जाऊन नेत्र तपासणी करतात व रुग्णांना मोफत औषधी ,चसमें वाटप करतात आणि ज्या रुग्नांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे अश्या रुग्नांना शस्त्रक्रियेसाठी तारीख दिली जाते आणि त्या तारखेला संबंधित गावात संस्थेची चारचाकी वाहने पाठवून रुग्नांना चिकलठाणा येथील नेत्र रुगालयात नेऊन दाखल करून त्या ठिकाणी राहण्याची,जेवणाची व शस्त्रक्रियेसाठी इतर खर्च संस्थेच्या वतीने करून यशही शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना पुन्हा वाहनाने घरी नेऊन सोडले जाते अश्या डॉ.देवेश पाथ्रीकर यांच्या उपक्रमाने ग्रामीण भागातील रुग्णांना चांगली सुविधा मिळत असल्याने रुगणांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीने बदनापूर तालुक्यातील मागील दोन वर्षात ११० मोफत नेत्र तपासणी शिबिरे घेण्यात आली व या शिबिरांच्या माध्यमातून १५ हजार लोकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे , २४ जानेवारी रोजी बदनापूर मतदार संघातील दगडवाडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले या शिबिरात जवळपास १८८ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली यामध्ये ५३ रुग्णांची शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांना औषधी देऊन शस्त्रक्रियेसाठी तारीख देण्यात आली,सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी सरपंच ,उपसरपंच ,सदस्य आदींनी परिश्रम घेतले








