भर दिवसा घडली घटना
बदनापूर (जालना )
अज्ञात कारणावरून लहान्या भावाने काही नातेवाईकांच्या मदतीने मोठ्या भावाचा व पुतण्याचा भर दिवसा चाकू भोसकून खून केल्याची दुर्दैवी घटना बदनापूर शहरातील शंकरनगर भागात घडली असून सदर घटना पोलीस ठाण्याच्या काही हाकेवर घडल्याने पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जात आहे. अशोक अंबिलढगे व यश अंबिलढगे असे मूर्तकाची नावे आहेत.
बदनापूर शहरातील शंकरनगर भागातील अशोक अंबिलढगे व त्यांच्या लहान्या भावात काही कारणावरून १३ मे रोजी सकाळी बाचाबाची होऊन मारहाणीची घटना घडली ,सदर वाद झाल्यानंतर दुपारी १ वाजे दरम्यान अशोक अंबिलढगे वय ५५ व त्यांचा मुलगा यश अंबिलढगे वय २२ हे आपल्या घरात बसलेले असतांना अचानक लहाना भाऊ विष्णू अंबिलढगे व त्यांच्या सोबत अन्य काही नातेवाईक ,मित्र आले आणि पुन्हा वाद विवाद सुरु झाला सदर वाद जवळपास २० मिनिटे चालला दरम्यान आलेल्या नातेवाईक,मित्र पैकी काही जणांनी थेट अशोक अंबिलढगे यांच्या पोटात तीष्ण हत्याराने वार सुरु केले तसेच यश अंबिलढगे यांच्या गळ्यावर चाकूचे वार केल्याने दोघे हि राक्तबंबाळ झाल्याने बघणाऱ्या पैकी कोणी तरी पोलिसांना फोन केला व त्यानंतर काही वेळाने पोलीस आले परंतु हल्लेखोर फरार झाले होते.
अशोक अंबिलढगे व यश अंबिलढगे यांना तात्काळ बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दोघे हिची गतप्राण झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले विशेष म्हणजे सदर घटना पोलीस ठाण्याच्या ३०० मीटर अंतरावर घडली आहे. या प्रकरणी विष्णू अंबिलढगे यांना पोलिसांनी तपास कामी पोलीस ठाण्यात नेले.








