तुकाराम राठोड
प्रतिनिधी:(जालना)श्रीपाद श्रीवल्लभ चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत जालना जिल्ह्यातील 108 गावांमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत प्रत्येक शाळेमध्ये 108 वर्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे.
दिनांक एक ऑगस्ट समाजसेवक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज ही सुरुवात आम्ही जालना जिल्ह्यातील डांबरी या गावापासून सुरुवात करित आहे.अशी प्रतिक्रिया कैलास पवार यांनी दिली आहे.आज आपल्या जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा.श्री.तुषार दोशी साहेब यांच्या हस्ते डांबरी जि.प.प्रा शाळा येथे वृक्ष रोपण करण्यात आला.यावेळी गावातील तसेच परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.









