गणेशोत्सवाची संपूर्ण राज्यभरात धामधूम सुरू झाली आहे.आप्तस्वकीयांसह १० दिवसांचा हा उत्सव साजरा करण्यासाठी अनेक लोक गावाकडची वाट पकडत आहेत. इतर ठिकाणच्या तुलनेत कोकणातील गणेशाेत्सव अतिशय वेगळा आणि उत्साहपूर्ण असतो. जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी कोकणी माणूस गणेशोत्सवाला गावी जातोच.त्यामुळे या मार्गावर अनेक विशेष रेल्वे व राज्यभरातून एसटी बस सोडण्यात आल्या आहेत. मराठवाड्यातून एकूण ९१७ बस कोकणासाठी सोडण्यात आल्या आहेत.त्यामुळे मराठवाड्यातील लांब पल्ल्याच्या व जिल्हाअंतर्गत बस सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. उत्सवाच्या पहिल्यादिवशी अनेकांची गैरसाेय झाली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठ आगारांच्या २००बसेस काेकणाकडे वळवल्या, वैजापुरात एसटीआगाराकडून ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत ७ हजारकिलोमीटर प्रवास कपातीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, हिंगोलीसह वसमत वकळमनुरी आगारातून १२ बस कोकणासाठी पाठवल्या आहेत. परभणी, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, रिसोड,नांदेड या मार्गावरील बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या.यामध्ये लांब पल्ल्याची छत्रपती संभाजीनगर ही बस फेरीरद्द केल्याने प्रवाशांची अडचण झाली. दरम्यान, लातूर विभागातून १८५ बस ठाण्याला पाठवल्या असून त्यातील ५०बस परत येणार असल्याचे सांगण्यात आले.







