• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपला जिल्हा

बदनापूर शहरासह तालुक्यात चोरी व दरोड्याच्या घटनात वाढ़, पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाने लावला छडा, चार आरोपी अटकेत तीन दिवसांचा पी सी आर

गावमत by गावमत
September 29, 2023
in आपला जिल्हा
0
बदनापूर शहरासह तालुक्यात चोरी व दरोड्याच्या घटनात वाढ़, पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाने लावला छडा, चार आरोपी अटकेत तीन दिवसांचा पी सी आर
0
SHARES
3.9k
VIEWS

बदनापूर

बदनापूर शहरासह मागील काही दिवसांमध्ये बदनापुर तालुक्यात वाहन चोरी, जबरी चोरीचे गुन्हयात झालेली वाढ लक्षात घेता मा. पोलीस अधिक्षक साहेब, जालना यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी, जालना यांच्या सुचनेप्रमाणे श्री. सुदाम भागवत, पोलीस निरीक्षक बदनापुर यांनी विशेष पथक स्थापन केले.

सदर पथकाने बदनापुर तालुक्यातील घडलेल्या वाहन चोरी व जबरी चोरीच्या गुन्हयांची माहिती प्राप्त केली, त्या अनुषंगाने सर्व दाखल गुन्हयातील चोरीस गेलेले घटनास्थळास भेट देवून आरोपीच्या येण्याजाणा-या मागांवरील सीसीटिव्ही फुटेज, तांत्रिक विष्लेशन तसेच गुप्त बातमीदार यांचा वापर केला. त्याआधारे वाहन चोरी मधील आरोपी बदनापुर येथे आला असल्याची माहिती मिळाल्यावरुन माहितीच्या आधारे आरोपी नामे संदीप कारभारी कोल्हे याला ताब्यात घेतले. त्याने बदनापुर येथून पोलीस स्टेशन गुरनं. 379/2023 कलम 379 मधील एक दुचाकी बजाज पल्सर 220 क्र. एमएच 21 बीपी 9392 हे त्यांचे राहते घरासमोरुन चोरुन ती गाडी त्याचा मित्र आशिष संजय कांबळे रा. बदनापुर यांच्या सोबत नेवुन त्यांचा मित्र विशाल अशोक जाधव रा. चिखलठाणा याच्या घरी नेवुन ठेवली असल्याची माहिती दिल्याने पोलीस पथकाने तिथे जावुन सदरचे वाहन जप्त केले. सदर वाहन जप्त करते वेळी त्यावर बनावट वाहन क्र. एमएच 20 बीएफ 9000 असा नंबर टाकुन ते वाहन वारपत होता.

आरोपी संदीप काल्हे याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने त्याचे सहकारी मित्र आकाश गणेश ज-हाड व अभिषेक ज-हाड दोन्ही रा. बदनापूर यांचे सोबत मिळुन दिनांक 30/07/2023 रोजी रात्री 0800 वा सुमारास बाजार वाहेगांव रोडवर कुसळी शिवारात एक इसम नामे ओ कार कुलकर्णी या पानीरक कॉलेजच्या विद्यार्थ्यास रस्त्यात अडवून त्याच्या हातातील दोन अंगठया व एक विवो कंपनीचा मोबाइल असा 55000/- रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढुन घेतल्याची कबुली दिली आहे. त्यावरून दोन्ही आरोपींना अटक करुन त्यांनी गुन्हयात वापरलेली मोटर बजाज पल्सर 220 विना नंबर प्लेट असलेली किंमती अंदाजे 100000/- रुपये ही सुध्दा जप्त करण्यांत आली असून सदर वाहन हे त्यांनी चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच गुन्हयाचे तपासात चोरी गेलेला विवो कंपनीचा मोबाईल किमती 10000/- व एक सोन्याचा अंगठी किंमती रुपये 30000/- रुपये असा गुन्हयात जप्त करण्यांत आला आहे. इतर आरोपींचा शोध सुरु आहे.

सदर दोन गुन्हयांची उकल करून दोन मोटर सायकल किंमती अंदाजे 200000/- रुपये, एक विवो कंपनीचा मोबाईल फोन किमती अंदाजे 10000/- रुपये व एक सोन्याचा अंगठी किमती रुपये 30000/- रुपये असा एकुण 240000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यांत आला आहे. सदरची कामगिरी मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. सुदाम भागवत् सपोनि. श्री. जगदीश

पवार, पोउपनि श्री. बाबासाहेब खाडे, सफी/ श्री ठाकुर, पोहेकॉ 480 श्री जोनवाल, श्री. घोडके, श्री. ज-हाड, पोकों/श्री,

तडवी, श्री. शेख यांनी केली आहे.

Related Posts

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार
आपला जिल्हा

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

August 11, 2025
मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे
आपला जिल्हा

मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे

August 9, 2025
किरकोळ कारणावरून बाप, लेकाचा तीष्ण हत्याराने खून
आपला जिल्हा

किरकोळ कारणावरून बाप, लेकाचा तीष्ण हत्याराने खून

May 13, 2025
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेश वाटप!
आपला जिल्हा

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेश वाटप!

March 22, 2025
एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?
आपला जिल्हा

एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?

March 22, 2025
दगडवाडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात 188 रुग्णांची तपासणी
आपला जिल्हा

दगडवाडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात 188 रुग्णांची तपासणी

January 24, 2025
Next Post
आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार हाजी मन्सूर खान यांना प्रदान

आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार हाजी मन्सूर खान यांना प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In