• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

जिल्हा परिषद शिक्षकांची २९६ पदे अतिरिक्त मात्र शिक्षण विभागाला समायोजनासाठी वेळ मिळेना; शिक्षकांच्या नियुक्तीसाठी ग्रामस्थांवर आंदोलनाची वेळ :- डॉ.गणेश ढवळे

गावमत by गावमत
August 18, 2024
in महाराष्ट्र
0
जिल्हा परिषद शिक्षकांची २९६ पदे अतिरिक्त मात्र शिक्षण विभागाला समायोजनासाठी वेळ मिळेना; शिक्षकांच्या नियुक्तीसाठी ग्रामस्थांवर आंदोलनाची वेळ :- डॉ.गणेश ढवळे
0
SHARES
4
VIEWS

अहमदनगर:- ( प्रशांत बाफना)

बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये शिक्षकांच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शाळा भरवणे, शाळेला कुलूप ठोकणे, पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणे अशा घटना घडत असुन प्राथमिक पदवीधरांच्या रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात यावे अशी मागणी अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी ; मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद यांना लेखी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, शेख युनुस,शेख मुबीन यांनी केली आहे. मात्र भगवान फुलारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद बीड यांनी शिक्षण विभाग जिल्हा परिषद बीड अंतर्गत सद्यस्थितीत सहशिक्षकांची २९६ पदे रिक्त असुन त्यांचे समायोजन करण्यासाठी सह शिक्षकांना प्राथमिक पदवीधर, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख या पदांवर पदोन्नती देऊन जिल्हा परीषद मध्ये रिक्त होतील त्या पदांवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचे प्रस्तावित असून अतिरिक्त सहशिक्षकांचे समायोजन झाल्यानंतर लगेच आंतरजिल्हा बदलीने रूजु झालेल्या सह शिक्षकांना पदस्थापना देण्यात येईल म्हटले आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अडीच महिने झाले आहेत.अनेक शाळांना शिक्षक नसल्याच्या तक्रारी असुन अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल मात्र शिक्षण विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.


बीड जिल्ह्यात मराठी व उर्दू माध्यमातील प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या मंजुर १५२८ पदांच्या तुलनेत ११४२ शिक्षक कार्यरत आहेत. जिल्ह्यात २०२२-२३ च्या संच मान्यतेनुसार सहशिक्षकांची ६२४३ मंजुर पदे आहेत.कार्यरत पदांची संख्या ६३३५ आहे तर जवळपास २९६ पदे अतिरिक्त आहेत.

तालुक्यातील अतिरिक्त शिक्षक

तालुका. मंजुर पदे. अतिरिक्त

अंबेजोगाई ४६२ २९
आष्टी ७११ ३१
बीड ९८३ १००
गेवराई ८९२ ४८
धारूर ३६० २२
केज ६३० ०५
माजलगाव ५६७ ०६
परळी ४९६ ३०
पाटोदा ४२६ ००
शिरूर (का) ४३५ १२
वडवणी २८१ १४
एकुण ६२४२ २९७

आंतर जिल्हा बदलीने रूजु ५० शिक्षकांना पदस्थापनाच नाही ; ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयाचे उल्लंघन :- डॉ.गणेश ढवळे

बीड जिल्ह्यात ऑनलाइन आंतर जिल्हा बदलीने मागील अडीच महिन्यात वेगवेगळ्या जिल्हा परिषदेमधून ५० शिक्षक बीड जिल्हा परिषदेमध्ये रुजू झालेले आहेत मात्र त्यांना अद्याप पदस्थापना देण्यात आलेले नाही. वास्तविक पाहता ऑनलाईन आंतरजिल्हा बदलीने आठवडाभरात जेवढे शिक्षक रुजू झाले असतील त्यांचे प्रत्येक सोमवारी सेवा जेष्ठता यादी जिल्हा परिषदेने तयार करून दर मंगळवारी अशा शिक्षकांना समुपदेशनाने पदस्थापना देण्याबाबतचे शासनाचे निर्देश आहेत आठवडाभरात आलेल्या सर्व शिक्षकांना पुढील मंगळवारी पद स्थापना दिलीच पाहिजे असा दंडक महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि.२३ मे २०२३ च्या शासन निर्णयानुसार घालून दिलेला असतानाही अडीच महिने उलटूनही संबंधित ५० शिक्षकांना पदस्थापना देण्यात आलेले नाही त्यामुळे जिल्ह्यात एकीकडे शिक्षकांना शाळेतील मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असताना शिक्षकांना पदस्थापना न देणे ही गंभीर बाब असून तातडीने प्रस्थापना करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. पदस्थापना दिल्यानंतर ५० शिक्षकांना विना कामाचा पगार द्यावाच लागणार आहे. त्यापेक्षा त्यांची पदस्थापना करणं आवश्यक आहे.

Related Posts

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले

April 7, 2026
दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
महाराष्ट्र

दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

September 29, 2025
विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र

विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल

July 31, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार
महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार

June 14, 2025
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..
महाराष्ट्र

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..

June 7, 2025
महाराष्ट्र

वाहनांना ‘एचएसआरपी’ नाही; मग’आरटीओ’तील कामे विसरा !२०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक : नंबर प्लेटसाठी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य

June 7, 2025
Next Post
रामदेव बाबा सत्संग परिवार शेवगाव यांच्याकडून लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय मध्ये श्रीमान.सुशीलजी बजाज महाराज यांचे जम्मा जागरण चे भव्य आयोजन

रामदेव बाबा सत्संग परिवार शेवगाव यांच्याकडून लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय मध्ये श्रीमान.सुशीलजी बजाज महाराज यांचे जम्मा जागरण चे भव्य आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In