अहमदनगर( प्रशांत बाफना) – साधने मध्ये निर्भय अवस्था श्रेष्ठ झाली पाहिजे.अभयापेक्षा निर्भय श्रेष्ठ आहे. आनंद फक्त अनुभवावा लागतो.संत जी इच्छा करतात ना ती पूर्ण होत असते, ज्ञानाने प्रकाश पडतो, पण क्रिया आपल्यालाच करावी लागतात.देव अनुभवावा लागतो, आनंद हे देवाचे स्वरूप आहे, देव हे संत आहेत आणि संत हे देव आहेत, दोन्ही मध्ये काहीही फरक नाहि, संत हे याच शरीरामध्ये सर्व अवस्था प्राप्त करुन देतात. देव पूजा करणे म्हणजे भक्ती करणे होय. शरीरामध्ये भगवान परमात्म्याला अर्पण करण्यासाठी महत्त्वाचा भाग हा हृदय आहे. लोटांगण घालणं ही शेवटची शरणांगती आहे. नामाशिवय सुखाची प्राप्ती होत नसते ते सूख प्राप्त करण्यासाठी भगवान परमात्म्याला शरण जावे लागेल.तीर्थ यात्रेमध्ये अनेक साधू संत एकत्र येतं असतात. त्या एकत्र आल्यावर ज्या भूमीवर येतात. ती भूमि पावित्र भूमि होते.
विसाव्या शतकातील महान संत विभुती वै. ह. भ. प ज्ञानेश्वर माऊली महाराज श्री क्षेत्र चाकरवाडीकर यांच्या कृपा आशिर्वादाने आणि ह भ प गुरुवर्य तपोनिधी शांतीब्रह महादेव महाराज तात्या यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह व गुरूवर्य तपोनिधी बाळनाथ महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाची सुरुवात 12 ऑगस्ट 2024 या दिवशी झाली आणि सांगता 19 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे. यादरम्यान 17 ऑगस्ट 2024 सहाव्या दिवसाची कीर्तन सेवेमध्ये नारायण महाराज भाऊ बोलत होते.
ह भ प नारायण महाराज भाऊ यांनी जगद्गुरु तुकाराम यांचा चार चरणाचा अभंगावर चिंतन केले. घेईन मी जन्म याजसाठीं देवा । तुझी चरणसेवा साधावया ॥१॥ हरीनामकीर्तन संतांचे पूजन । घालूं लोटांगण महाद्वारीं ॥ध्रु.॥ आनंदें निर्भर असों भलते ठायीं । सुखदुःख नाहीं चाड आम्हां ॥२॥ आणीक सायास न करीं न धरीं आस। होईन उदास सर्व भावें ॥३॥ मोक्ष आम्हां घरीं कामारी ते दासी। होय सांगों ऐसी तुका म्हणे ॥४॥ देवा मी जन्म घेईन तर केवळ तुझी चरण सेवा साधण्याकरीताच. मग मी हरिनाम कीर्तन करीन संतांची पूजन करीन आणि महाद्वारात लोटांगण घालीन. आम्ही जिथे कुठे राहू तेथे आनंदाने समृद्ध राहु. सुख आणि दुख यांची आवड तर आम्हाला राहिलीच नाही. तुझी चरण सेवा करण्यावाचून इतर कोणतेही कष्ट मी करणार नाही आणि कशाचीही इच्छाही धरणार नाही आणि मग या संसारापासून मी सर्वभावे उदास होऊन राहील. तुकाराम महाराज म्हणतात अहो मोक्ष तर आमच्या घरी काम करणारी दासीच आहे तिला आम्ही जसे काम सांगू तसे काम ती करते.
संपत्ती ही पचवता आली पाहिजे आणि ज्ञान हे पचवता आले पाहिजे इंद्रियांच्या पलीकडे बुद्धी आहे. ज्या गोष्टी देवाला करता येत नाही त्या गोष्टी संत करत असतात. संतांच्या पूजनात जेवढ पुण्य आहे ना तेवढ पुण्य कश्याताच या नाही.
यावेळी मृदंगाचार्य अमोल महाराज पवार चाकरवाडीकर, अविष्कार महाराज क्षीरसागर, राधाकृष्ण महाराज माखले, महादेव महाराज रोडे, ह. भ. प हनुमान महाराज घोलप, ह. भ. प प्रशांत महाराज क्षीरसागर , गणेश महाराज भोसले, अनिकेत महाराज आविष्कार महाराज क्षिरसागर तसेच महाराज मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.
तसेच यावेळी नानासाहेब काकडे पोलिस पाटील चाकरवाडी, ज्ञानोबा अनवणे, मंचिक पवार, बाबासाहेब मोरे, माजी सरपंच चत्रभूज पवार, परमेश्वर भोसले सर, अनवणे काका, माऊली न्युज मुख्य संपादक पवार अभिजीत, चाकरवाडी ग्रामस्थ, पंचक्रोशीतील भाविक भक्त उपस्थित होते.








