बदनापूर
श्री.गणेश उत्साहवनिमित्त शहरासह तालुक्यात शांतता राहावी म्हणून बदनापूर पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असता सदर बैठक वादळी ठरली असून या बैठकीत शहरासह तालुक्यात सुरु असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करा अशी मागणी करण्यात आली असून पोलीस निरीक्षकाने तात्काळ अवैध धंदे बंद न केल्यास दोन दिवसात बदली करेल अशी तंबी आमदार नारायण कुचे यांनी पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांना बैठकीत दिली.
७ सप्टेंबर रोजी श्री गणेश स्थापना होत असल्याने गणपती उषा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बदनापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुदाम भागवत यांनी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करून नागरिक,शांतात समिती सदस्य, पत्रकार ,वकील आदींना सोशल मीडियावर ७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता बैठीकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली,या बैठकीस आमदार नारायण कुचे उपस्थित होते. बैठकीत शहरातील सामाजिक कार्यकर्ते राहुल जऱ्हाड यांनी गंपोरी उत्साह काळात चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा, शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी,ज्या ठिकाणी विसर्जन केले जाते त्या ठिकाणी दिवा बत्ती व सुरक्षेच्या दृष्टीने पथक तैनात ठेवावे तसेच शहरासह तालुक्यात मटका,जुगार,अविध दारू ,व इतर अवैध धंदे सुरु आहेत ज्यामुळे शांतता भंग होते ते तात्काळ कायमस्वरूपी बंद करावेत असे सुचविले.
शांतता समितीच्या बैठकीत अवैध धंद्यांचा मुद्दा उपस्थित होताच अन्य सदस्यांनी देखील सदर मुद्दा उचलून धरल्यानंतर पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी येत्या दोन तीन दिवसात अवैध धंदे बंद केले जाईल असे उत्तर देताच आमदार नारायण कुचे भडकले व म्हणाले कि, अवैध धंदे बंद करायला दोन तीन दिवस काय करायचे तात्काळ मोहीम राबवा अन्यथा मी तुमची बदली कंट्रोल रूमला करायला लावतो ,यावेळी अन्य लोकांनी देखील पोलिसांच्या भूमिकेबद्दल रोष व्यक्त केला ,बैठकीस नगरसेवक गोरखनाथ खैरे,गजानन गीते ,संतोष पवार ,भीमराव जावळे ,शेख युनूस गुड्डू, बबलू चौधरी, राम सिरसाठ सह अनेक नागरिक,पत्रकार,पदाधिकारी उपस्थित होते.









