बदनापूर / आदिल खान पठाण
झुंजार छावा सामाजिक संघटनेच्या वतीने बदनापूर मतदार संघात जाहीर झालेला पाठिंबा अधिकृत नसुन कोणत्याही पक्षाला आम्ही पाठिंबा दिला नाही, या विषयाचा खुलासा करण्यासाठी बदनापूर मध्ये महत्त्वाची पञकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेत झुंजार छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील कोटकर यांनी संघटनेतील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन यासंदर्भात सविस्तर चर्चा करून याबाबत खुलासा करत पत्रकार परिषदेत पञकारांशी संवाद साधला, पुढे बोलताना त्यांनीं सांगीतले की आमच्या विचाराशी सहमत असलेल्या उमेदवारास आम्ही पाठिंबा देऊ शकतो परंतु अद्याप पर्यंत आम्ही कोणालाही पाठींबा दिला नाही व मराठवाड्यात कोणाला पाठिंबा द्यायचा व नाही द्यायचा याची सर्व जिम्मेदारी झुंजार छावा संघटना मराठवाडा अध्यक्ष आशोक नाईक यांच्याकडे सोपवण्यात आली आहे असे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.









