अमिर शेख
फलटण – रक्षक रयतेचा न्यूज आणि चंदूकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे आयोजित भव्य गौरी सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या विजेत्या फळांचे गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या धुमाळवाडी(ता फलटण)येथील सौ रेश्मा पवार या ठरल्या.
जनसेवा डायगनोस्टिक सेंटर, फलटण मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आध्यात्मिक क्षेत्रातील परमपूज्य राजन काका देशमुख महाराज हे होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केबी उद्योग समूहाच्या संचालिका सौ सुजाता सचिन यादव, चंदूकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेडचे ब्रांच मॅनेजर श्रेणिक दनोले, दत्तात्रय पवार ,ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता ,प्राध्यापक रमेश आढाव, मुंबई उच्च न्यायालयातील विधीतज्ञ व माऊली फाउंडेशन चे कार्याध्यक्ष ॲड विश्वनाथ टाळकुटे सामाजिक कार्यकर्ते आमिरभाई शेख, रविवार पेठ तालीम मंडळाचे मोहनराव पोतेकर, पत्रकार युवराज पवार, योगेश गंगतीरे ,काकासाहेब खराडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ सुजाता यादव यांनी रक्षक रयतेचा न्यूज व चंदुकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे गौरी स्पर्धा चांगल्या पद्धतीने भरल्याबद्दल समाधान व्यक्त करून या पुढील काळात रक्षक रयतेच्या न्यूजच्या प्रत्येक उपक्रमाला सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली.
परमपूज्य राजन काका देशमुख महाराज यांनी रक्षक रयतेचा व चंदुकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड च्या वतीने गौरी स्पर्धा या अत्यंत चुरशीने पार पडल्याबद्दल समाधान व्यक्त करून कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांची मोठी संख्या जमलेली पाहता महिलांमध्ये या स्पर्धेबद्दल किती उत्साह होता हे दिसून आले असल्याचे सांगितले.
यावेळी जेष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता, प्राध्यापक रमेश आढाव आमिरभाई शेख, ॲड विश्वनाथ टाळकुटे यांची भाषणे झाली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने बारामती येथील शाहू हायस्कूलचा विद्यार्थी आणि आपल्या वाणीने संपूर्ण महाराष्ट्राला आपलेसे करणारा धम्मदीप नानासो आढाव या इयत्ता सहावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याने अत्यंत आपल्या मंत्रमुग्ध भाषणात विविध महापुरुषांची उदाहरणे देऊन महिलांना जागेवर खिळवून ठेवले. महिलांविषयी असणारा आदर विविध उदाहरणाद्वारे स्पष्ट केला. धम्मदीप आढाव यांच्या भाषणाला उपस्थित महिलांनी टाळ्यांच्या गजरात मोठी साथ दिली. त्याचा खास सत्कार ॲड .विश्वनाथ टाळकुटे यांचे हस्ते करण्यात आला.
या गौरी स्पर्धेमध्ये सातारा जिल्हा व पुणे ग्रामीण मधून मोठ्या संख्येने स्पर्धक उतरले होते अत्यंत चुरशीने झालेल्या या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक धुमाळवाडी येथील सौ रेशमा नितीन पवार यांनी मिळविला. द्वितीय क्रमांक सौ कांताबाई हुंबे पवार (अकलूज), तृतीय क्रमांक सौ सरिता टेंबरे (बरड), चौथा क्रमांक पूनम रणवरे (फलटण), पाचवा क्रमांक सौ दिपाली पिसाळ (शेरे शिंदेवाडी) सहावा क्रमांक सौ रेश्मा राजेन्द्र ननवरे (फलटण) सातवा क्रमांक सौ मनीषा निंबाळकर( फलटण), आठवा क्रमांक सौ पद्मा टाळकुटे(फलटण) नववा क्रमांक अरुणा पोपट साळुंखे(राजुरी)सौ सोनम सुजित जमदाडे (जाधववाडी) यांना मिळाला.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रशांत धनवडे , कमलेश भट्टड इम्तियाज तांबोळी तात्यासाहेब गायकवाड सौ नेहा ठाकूर सौ नंदा बोराटे नीता जोशी, सौ मनीषा घडिया सौ रूपाली कचरे, सौ अनुराधा रणवरे यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चंदूकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड, के बी उद्योग समूह ,श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ फलटण, रविवार पेठ तालीम मंडळ फलटण ,जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर फलटण, जयहिंद कलेक्शन फलटण, नवनिर्माण सेवा संघ फलटण, अमीरभाई शेख मित्र मंडळ फलटण यांचे अनमोल सहकार्य लाभले.
प्रास्ताविक सौ रूपाली कचरे यांनी, सूत्रसंचालन सौ अनुराधा रणवरे यांनी तर आभार सौ नंदा बोराटे यांनी मानले.
सर्वांचे स्वागत रक्षक रयतेचा न्यूज कार्यकारी संपादक राजू बनसोडे ,उपसंपादक शशिकांत आढाव ,उद्धव बोराटे व वैभव शेंडे यांनी केले.
स्पर्धेमध्ये सहभागी प्रत्येकाला हमखास बक्षीस देण्याबरोबरच या कार्यक्रमास स्पर्धका व्यतिरिक्त उपस्थित असणाऱ्या इतर महिलांमधूनही लकी ड्रॉ च्या माध्यमातून एक पैठणी आणि इतर २ बक्षीसे वाटण्यात आली.









