फलटण- अमिर शेख
भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त फलटणमधील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.
फलटण शहरातील गजानन चौक येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच गर्दी झाली फलट्यामधील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा महात्मा गांधी यांना अभिवादन केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमीरभाई शेख, माजी नगरसेवक सुरेश पवार, महेश वादे ,बंडू उर्फ शंकरराव कदम ,तात्यासाहेब गायकवाड बंडू अहीवळे ,ऋषिकेश बिचुकले आदी उपस्थित होते. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याभोवती जयंती निमित्त आकर्षक सजावट करण्याची मागणी आमिरभाई शेख यांनी केली होती. ती मागणी नगरपालिकेने पूर्ण केल्याबद्दल आमिरभाई शेख यांनी नगरपालिकेचे आभार मानले.









