• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपला जिल्हा

ड्रायव्हर, त्याचा भाऊ अन् नातेवाईक अपहरणामागील मास्टरमाइंड‎

गावमत by गावमत
May 20, 2022
in आपला जिल्हा
0
ड्रायव्हर, त्याचा भाऊ अन् नातेवाईक अपहरणामागील मास्टरमाइंड‎
0
SHARES
3
VIEWS

 जालना‎ ड्रायव्हरनेच सख्ख्या भावाच्या‎ मदतीने मालकाच्या १६ वर्षीय‎ मुलाला चारचाकी वाहनात बसवून‎ चाकूचा धाक दाखवत बुधवारी‎ दुपारी अपहरण केले होते. ४ कोटी‎ रुपये द्या, नंतरच मुलाला घेऊन जा,‎ अशी मागणी मुलाच्या पालकांकडे‎ ठेवली होती. परंतु, पोलिस मागावर‎ असल्याचे समजताच इतर तीन‎ जणांनी पळ काढून चालक,‎ अपहरणकर्ते मुलाला सोडून देत‎ पसार झाले होते. दरम्यान,‎ पोलिसांनी चालकाची सखोल‎ चौकशी केली. परंतु, तो दोघांचेही‎ अपहरण झाल्याचे भासवत‎ पोलिसांची नजर चुकवत होता.‎ दरम्यान, एसपींनी स्वत: एक तास‎ तर एलसीबी पथकाने पाच तास‎ प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर‎ ड्रायव्हरने सख्खा भाऊ व इतरांच्या‎ मदतीने ४ कोटी रुपये‎ मिळवण्यासाठीचा ‘प्लॅन’ उलगडून‎ सांगितला. यानंतर रात्रीच दोन‎ आरोपींना जेरबंद करण्यात आले,‎ तर एकाचा तपास सुरू आहे.‎ जालना शहरातील पोदार शाळेत‎ परीक्षा देण्यासाठी आलेल्या स्वयम‎ महावीर गादिया (१६) या मुलाचे‎ अपहरण झाले होते. भरदिवसा‎ घडलेल्या या घटनेमुळे एकच‎ खळबळ उडाली होती. तालुका‎ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल‎ झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा,‎ तालुका, अंबड, गोंदी पोलिसांनी‎ पथके स्थापन करून चारचाकी‎ वाहनाचा शोध सुरू केला होता.‎ सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास‎ शहापूर येथे चालक व अपहरणकर्ते‎ दोघेजण वाहनासह आले होते. ‎ ‎ चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर ‎ ‎ आमच्या दोघांचेही अपहरण झाले‎ होते, असे पोलिसांना ड्रायव्हर‎ भासवत होता. परंतु, पोलिसांनी ‎ ‎ खोलवर जाऊन तपास केला‎ असता, चालकानेच सख्ख्या‎ भावाच्या मदतीने व्यापाऱ्याला ४‎ कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा‎ प्लॅन आखला होता. परंतु, पोलिस ‎ ‎ मागावर असल्याचे समजताच हा‎ प्लॅन फसला. ही कारवाई पोलिस‎ अधीक्षक आर. रागासुधा, अपर‎ पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख‎ यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय‎ सुभाष भुजंग, पीएसआ प्रमोद‎ बोंडले, सॅम्युअल कांबळे, फुलचंद‎ हजारे, गोकुळसिंग कायटे, विनोद‎ गडदे, जगदीश बावणे, कृष्णा तंगे,‎ सचिन चौधरी, रुस्तुम जैवाळ,‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ प्रशांत लोखंडे, फुलचंद गव्हाणे,‎ रंजी वैराळ, सागर बाविस्कर,‎ दत्तात्रय वाघुंडे, सुधीर वाघमारे,‎ देविदास भोजने, भागवत खरात,‎ किशोर पुुंगळे, कैलास चेके, याेगेश‎ सहाने, सचिन राऊत, रवी जाधव,‎ धम्मपाल सुरडकर, रमेश पैठणे,‎ शडमल्लू यांनी केली आहे.‎ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ आरोपींना रात्रभर विविध भागातून‎ पकडून तालुका पोलिसांच्या ताब्यात‎ दिले आहे. दुकानात दररोज लाखो‎ रुपयांची उलाढाल होत असल्याची‎ ड्रायव्हरने इतर साथीदारांना माहिती‎ दिली होती. या अनुषंगाने इतर दोन्ही‎ आरोपींनी दुकानात जाऊन माहिती‎ घेतली होती. यानंतर मुलाचे‎ अपहरण करून हा प्लॅन आखला‎
याच गाडीत मुलाचे करण्यात आले होते अपहरण.‎
संशयित आरोपींना भेटण्याची तालुका पोलिस ठाण्याच्या‎ अधिकाऱ्यांकडून नातेवाइकांना मिळाली मूकसंमती‎ अपहरणाच्या प्रकरणातील संशयित आरोपींना भेटण्यासाठी नातेवाईक मोठ्या‎ प्रमाणात येत होते. एपीआय खाडे, अंभोरे यांच्या उपस्थितीत कस्टडी‎ रूममध्ये घुसून नातेवाईक आरोपींशी संवाद साधत होते. याला दोन्ही‎ अधिकाऱ्यांची मूकसंमती दिसून येत होती.‎
ड्रायव्हरवर मालकाचा‎ होता अत्यंत विश्वास‎ चालकाची चौकशी करीत असताना‎ पोलिसांनी मालकाला ड्रायव्हर हे‎ करू शकतो का, असे विचारले.‎ तेव्हा मालकाकडून अत्यंत विश्वासू‎ ड्रायव्हर असल्याचे पोलिसांना‎ सांगण्यात आले. यामुळे पोलिसांची‎ तपासाची दिशा थोडी बदलत होती.‎ परंतु, खोलवर गेल्यानंतर चालकच‎ मास्टरमाइंड असल्याचे समाेर आले.‎
यांनी रचला होता प्लॅन‎ चालक अक्षय अंकुश घाडगे,‎ अर्जुन अंकुश घाडगे (बारसवाडा,‎ ता. अंबड), आसाराम दरेकर (२६,‎ वाल्हा, ता. बदनापूर), अन्य‎ एकाच्या मदतीने हा गुन्हा केला‎ आहे. चौथा आरोपी अद्यापही फरार‎ आहे. अपहरण करताना ड्रायव्हरचा‎ भाऊ असलेल्या अर्जुन घाडगे याने‎ अपहरणकर्त्या मुलाला चाकू‎ लावला होता.‎‎
याच गाडीत मुलाचे करण्यात आले होते अपहरण.‎

Related Posts

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार
आपला जिल्हा

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

August 11, 2025
मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे
आपला जिल्हा

मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे

August 9, 2025
किरकोळ कारणावरून बाप, लेकाचा तीष्ण हत्याराने खून
आपला जिल्हा

किरकोळ कारणावरून बाप, लेकाचा तीष्ण हत्याराने खून

May 13, 2025
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेश वाटप!
आपला जिल्हा

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेश वाटप!

March 22, 2025
एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?
आपला जिल्हा

एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?

March 22, 2025
दगडवाडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात 188 रुग्णांची तपासणी
आपला जिल्हा

दगडवाडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात 188 रुग्णांची तपासणी

January 24, 2025
Next Post
अवैध पार्किंग विरोधात सोनारी ग्रामस्थ आक्रमक

अवैध पार्किंग विरोधात सोनारी ग्रामस्थ आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In