बदनापूर जि. जालना येतील बहुचार्चित कॅनरा बँक घोटाळ्याचा तपास एम. टी. सुरवसे, पोलिस निरीक्षक, पो. स्टे. बदनापूर यांनी जलद गतीने करून यातील दोन बॅंक मॅनेजर यांचे सहित एकूण 7 आरोपीस विविध ठिकाना वरून अटक करून ते मागील 4 महिन्यापूर्वी पासून जेरबंद केलेले आहेत, बँक घोटाळा करायचा आणि जामिनावर जेलचे बाहेर येऊन त्याच पैशावर डल्ला मरायचा अशी आरोपींची मानसिकता असते, परंतु हे प्रकरण त्याला अपवाद ठरले आहे, या गुन्ह्यातील रक्कम ही सर्व सामान्य लोकांची रक्कम हडप केली होती, हे प्रकरण गंभीरपणे घेऊन तीन महिन्याचे आत तपास पूर्ण करून सर्व आरोपीस अटक करून त्यांचे कडून बनावट सोने जप्त करून त्यांचे बँक खाते गोठऊन तपास पूर्ण करून त्यांचे विरुद्ध 1148 पाणी दोषारोप पत्र मा. न्यालयात सादर केले असून ही केस तत्काळ साक्ष पुरव्या कामी लावावी असे विनंती पत्र मा. न्यायालयाला देले आहे, दरम्यान यातील आरोपी यांनी जमीन मिळणे कामी मा. न्यायलयात अर्ज सादर केला असता मा. न्यायालयाने अर्ज फेटाळला आहे. सदरील जामीनाला सरकारी अभियोक्ता श्री. हर्षवर्धन ढगे यांनी भक्कम विरोध केला. तसेच त्यांनी मा. सर्वोच्च न्यायालयच्या विविध निवड्यांचा संदर्भ देत आर्थिक गुन्ह्यातील आरोपीना जमिनावर सोडण्यास आक्षेप घेतला.
न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला आहे, आरोपीना जामीन भेटुनये यासाठी बदनापूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री. सुरवसे यांनी गुन्ह्याचा तपास जलद गतीने करून दोषारोप पत्र मा. न्यायालयात दाखल केले.प्रस्तुत प्रकरणात सरकारी पक्षास पोलीस निरीक्षक श्री.सुरवसे,
श्री. केशवमुर्ती, उप महाप्रबंधक, कॅनरा बँक. छ. संभाजीनगर, पोका/ पूनम सिंग गोलवाल तसेच कोर्ट पैरवी श्रीमती. मपोका/ जिजा पवार यांनी मोलाचे सहकार्य केले आहे असे सरकारी अभियक्ता श्री. हर्षवर्धन ढगे, कोर्ट बदनापूर यांनी सांगितले आहे.








