बदनापूर,
कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाद्वारे अर्थशास्त्र नियोजन मंडळाची स्थापना करण्यात येऊन त्याचे उदघाटन पार पडले. या वेळी प्रकल्प अहवाल लेखन व मूल्यमापन या विषयावर परिसंवाद ही घेण्यात आला.
निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टच्या बदनापूर येथील पाथ्रीकर कॅम्प्स येथे अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. गणेश गावंडे यांनी अर्थशास्त्र नियोजन मंडळाची स्थापना करण्यासाठी पुढाकार घेतला होता. यावेळी प्राचार्या डॉ. एम. डी. पाथ्रीकर, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. देवेश पाथ्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प अहवाल लेखन व मूल्यमापन या विषयावर परिसंवादाचे आयोजनही करण्यात आलेले होते. या परिसंवादच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. एम. डी. पाथ्रीकर या होत्या, त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या स्थानिक समस्यांची उकल करण्यासाठी प्रकल्प अध्ययनातून शेतकरी, कामगार, बेरोजगारी या समस्या सोडवण्यासाठी प्रकल्पांचा आढावा घेऊन ग्रामीण समस्यांवर वास्तविक उपाययोजना सुचवल्या. यावेळी प्रमुख व्याख्याते डॉ. रामदास निहाळ यांनी प्रकल्प म्हणजे काय, प्रकल्प कार्याचे विविध टप्पे, संशोधन, तंत्रानुसार कशा पध्दतीने पूर्ण करावेत, प्रकल्प अहवालात कोणकोण्त्या घटकांचा समावेश करावा व तो करणे का आवश्यक असते या बाबत परिपूर्ण मार्गदर्शन केले. उपप्राचार्य प्रा. श्रीनिवास मुंगे यांनीही विद्यार्थ्यांना या वेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजक डॉ. गणेश गावंडे यांनी प्रकल्पाचा व अर्थशास्त्र नियोजन मंडळाचा उददेश व उदिदष्टे प्रास्ताविकात व्यक्त केली. या परिसंवाद व उदघाटन समारंभास डॉ. सिध्दार्थ मुंगे, डॉ. सुभाष सोनवणे, डॉ. खंडागळे, डॉ. सिरसाट आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन डॉ. यशवंत हाके यांनी तर आभार डॉ. संजयकुमार कांबळे यांनी मानले. या वेळी मोठया संख्येने विद्यार्थी व अर्थशास्त्र अभ्यासकांची उपस्थिती हेाती.







