बदनापूर / प्रतिनिधीतालुक्यातील जवसगाव येथे झालेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरात मोतीबिंदू चे 23 रुग्ण आढळून आले होते त्यापैकी 13 रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले असता 12 रुग्णांची यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया 7 मे रोजी करण्यात आली आहे.
निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टच्या बदनापूर न्यू लाईफ केअर हॉस्पिटल व चिकलठाणा लायन्स नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.देवेश पाथ्रीकर यांच्या पुढाकाराने जवसगाव येथे 5 मे रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले होते,या शिबिरात 193 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असता 23 रुग्ण मोतीबिंदू चे आढळून आल्याने शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला व रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी तारीख देण्यात आली आहे.
जवसगाव येथील मोतीबिंदू चे 23 रुग्णांपैकी 13 रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी 6 मे रोजी रुग्णालयात दाखल केले असता त्यांची वैधकीय तपासणी झाली व 7 मे रोजी त्या 12 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी झाली,संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.देवेश पाथ्रीकर यांनी रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांच्या खाण्या पिण्याची व्यवस्था केली.








