बदनापूर /प्रतिनिधी
निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टच्या न्यू लाईफ केअर हॉस्पिटल बदनापूर व लायन्स नेत्र रुग्णालय चिकलठाणा यांच्या संयुक्त विद्यमाने अन्वी येथे गुरुवार रोजी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले असून या शिबिरात २२२ रुग्नांची नेत्र तपासणी करण्यात आली असून २६ रुग्ण मोतीबिंदूचे आढळून आल्याने त्यांना शस्त्रक्रियेसाठी तारीख देण्यात आली आहे.
बदनापूर तालुक्यातील अन्वी निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक डॉ.देवेश पाथ्रीकर यांनी न्यू लाईफ केअर हॉस्पिटल व लायन्स नेत्र रुग्णालय चिकलठाणा यांच्या संयुक्त विद्यमाने ९ जून रोजी सकाळी ९ ते २ वाजे पर्यंत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते ,या शिबिरात 222 रुग्णानाची नेत्र तपासणी करण्यात आली असता 26 रुग्ण मोतिबिंदू चे आढळून आले,मोतीबिंदू असलेल्या रुग्नांना शस्त्रक्रियेसाठी यावेळी तारखा देण्यात आल्या तर नेत्र तपासणी झालेल्या रुग्णांना औषधी देण्यात आले.
अन्वी येथील नेत्र तपासणी शिबीर यशस्वी करण्यासाठी सरपंच सुभाष राठोड ,माजी उपसरपंच भगवान मुकोसे , शिवाजी ढाकणे ग्रा.पं. सदस्य ,सोसायटी चेअरमन बाबुराव ढाकणे , तंटा मुक्ती अध्यक्ष भगवान ढाकणे ,आरोग्य कर्मचारी डॉ. पठाण -, घोंटुबा पा. ढाकणे, कोरोना योद्धा रवीभाऊ ढाकने ,नारायण अन्हाड , मनेश म्हस्के यांनी परिश्रम घेतले









