बदनापूर / आदिल खान
बदनापूर तालुक्यातील ढोकसाळ रस्त्यावर ठिक ठिकाणी खड्डे पडले आहेत व या रस्त्यावरील पूल वाहून जाण्याच्या मार्गावर आहे, मुसळधार पाऊस आला की ओढ्याला पूर येऊन पुलावरून पाणी जाते व हा मार्ग आलेल्या पुरामुळे बंद होतो ढोसकाळ ते रोषणगाव व बदनापूर ला जोडणाऱ्या या रस्त्याचा संपर्क तुटून स्थानिक नागरिक व वाहनधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते रोषणगाव शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना रोज या रस्त्याने पुलावरून तारेवरची कसरत करून जावे लागते
व ओढ्याला पूर आला तर शाळेत जायचे कसे हा मोठा प्रश्न आहे ग्रामीण भागातील रस्त्यांची सध्या पावसाळ्यात दुरवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या रस्त्यावरून रोज कित्येक वाहने ये जा करत असतात या वाहनधारकांना पावसाळ्यात मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे या सर्व बाबीकडे संबंधित विभागाने वेळीच लक्ष देऊन याठिकाणी पूल बनवून रस्ता सुरळीत करावा अशी मागणी सध्या परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, नागरिक व वाहनधारक करत आहे.








