• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपला जिल्हा

कृषी उत्पन्न्न बाजार समितीच्या निवडणुकीत आता शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार-कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती श्री. भास्कर (आबा) पाटील दानवे

गावमत by गावमत
July 16, 2022
in आपला जिल्हा, राजकारण
0
कृषी उत्पन्न्न बाजार समितीच्या निवडणुकीत आता शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार-कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती श्री. भास्कर (आबा) पाटील दानवे
0
SHARES
98
VIEWS

                                     

जालना / तुकाराम राठोड

परवाच भाजपा – शिंदे युती सरकारने काही अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले, त्यातला एक म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना थेट मतदान करण्याचा अधिकार दिला. हा निर्णय घेतला त्यावेळी खऱ्या अर्थाने ग्रामीण महाराष्ट्रातल्या सामान्य शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. खरंतर हा निर्णय 2017 मध्ये ना रावसाहेब पाटील दानवे भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, देवेंद्र फडण्वीस मुख्यमंत्री आणि सुभाष (बापू) देशमुख हे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री असताना त्यांनी घेतला होता. मात्र त्यांनतर 2019 ला झालेल्या सत्ताबदलानंतर उद्धव ठाकरेंच्या महाआघाडी सरकारने तो निर्णय रद्द करत शेतकऱ्यांना मतदानापासून वंचित ठेवलं होतं. मात्र पुन्हा देवेंद्रजींनी या निर्णयाला समोर आणत, शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने मतांचा अधिकार मिळवून दिला.

जो शेतकरी काळ्या मातीत राबतो, कष्ट करतो अन उत्पादन केलेला आपला माल बाजार समितीत आणतो त्याला बाजार समितीच्या कोणत्याच प्रक्रियेत घेतलं जात नव्हतं. ना त्याला योग्य बाजारभाव मिळत होता, ना त्याला सोयीसुविधा मिळत होत्या.ज्या बाजार समितीची निर्मितीच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी झाली आहे असं म्हणतो तिथे सत्ता कुणाची असेल हे ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नव्हता, पण न्यायाची, कल्याणाची अन समृद्धीची अपेक्षा धरणार तरी कुणाकडे, अन ती आत्मीयता तरी कुणाकडे असणार हाच विचार सुभाष बापू देशमुख यांच्या पणन विभागाने लक्षात घेतला आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना 2017 पासून पहिल्यांदा मतांचा अधिकार मिळाला. तो खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचा पहिला संग्राम म्हणावा लागेल.

केवळ विविध विकास सोसायटी आणि ग्रामपंचायतच्या जोरावर बाजार समितीतली सत्ता ठरवायची ही पद्धत गेली वर्षानुवर्षे चालत राहिली अन आमचा शेतकरी पिचत राहिला, मुद्दाम भाव पाडला जायचा, त्याला सुविधा नाहीत, चोरीचे प्रमाण असायचे आणि या सगळ्या अडचणी असतानाही कुणालाच जाब विचारायला जाता यायचं नाही कारण बऱ्याच बाजार समित्या या आजारी होत्या. केवळ आपलं इप्सित साध्य करण्यासाठी त्याचा वापर केला जायचा.जेव्हा आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला तेव्हा ना. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले होते, “शेतकऱ्यांसाठी हा काळा दिवस आहे.”  व खऱ्या अर्थाने दुःख झालं होतं, कारण त्या निर्णयामागे त्यांनी शेतकऱ्यांचं खरं दुखणं ओळखलं होतं. पण मुळात प्रश्न हा आहे की राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता आल्यावरच मतदानाचा अधिकार का काढून घेतला? खरी भीती त्यांनाच का आहे?तर या राज्यातल्या अनेक बाजार समित्या वर्षानुवर्षे या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्याच ताब्यात राहिल्या आहेत, राहिल्या नव्हे तर ठेवल्याच होत्या.गेली सत्तर वर्षे गावागावातील विविध विकास सोसायट्या  काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हातात होत्या, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि गावपातळीपासून राज्यपातळी पर्यंत सर्व व्यवस्था ज्यांच्या हातात होती त्यांनी बळीराजाचे शोषण केलं, पंचायत समित्यात शेततळी योजना आली की ती आपल्या कार्यकर्त्यांना, नाहीतर मग आपल्याच घशात घालायची, नवीन बी बियाणं, युरिया आला की आपल्याच मालकीचा करायचा, गावातील विकास सोसायट्यावर सुद्धा पूर्वी काँग्रेस आणि आता अलीकडे राष्ट्रवादीने पश्चिम महाराष्ट्रात वर्चस्व मिळवलं आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं. तू कुणाचा कार्यकर्ता आहे हे बघून सोसायटीचे कर्ज आणि लाभ देण्याची लाजिरवाणी पद्धत आघाडीने रुजवली. बाजार समित्या तर  पैसे खाण्याचं कुरण केलं, कारण शेतकऱ्यांना अधिकार नव्हता अन काही जागृत शेतकरी आवाज उठवायचा, बोलायचा प्रयत्न करत होते तर त्यांना स्थानिक पातळीवर अडचणीत आणून शोषण केलं जायचं.

ज्यावेळी 2014 ला देवेंद्रजींच्या नेतृत्त्वात भाजपा सरकार आलं आणि ना. रावसाहेब पाटील दानवे प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला पहिला झटका बाजार समित्यात मतांचा अधिकार देऊन दिला अन दुसरा झटका हजारो पिशवीतल्या सोसायट्या बरखास्त करून दिला.आता पुन्हा एकदा एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात सरकार आले आहे.

 लोककल्याणाची अन शेतकरी समृद्धीची कामं सुरू झाली आहेत. आता कुठे आपलं सरकार आल्याची जाणीव होतेय, शेताभातात राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या उन्नतीची हीच तर खरी पाऊलवाट असेल, असे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री.भास्कर (आबा) पाटील  दानवे यांनी बोलतांना व्यक्त केले.

Related Posts

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार
आपला जिल्हा

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

August 11, 2025
मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे
आपला जिल्हा

मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे

August 9, 2025
किरकोळ कारणावरून बाप, लेकाचा तीष्ण हत्याराने खून
आपला जिल्हा

किरकोळ कारणावरून बाप, लेकाचा तीष्ण हत्याराने खून

May 13, 2025
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेश वाटप!
आपला जिल्हा

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेश वाटप!

March 22, 2025
एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?
आपला जिल्हा

एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?

March 22, 2025
दगडवाडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात 188 रुग्णांची तपासणी
आपला जिल्हा

दगडवाडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात 188 रुग्णांची तपासणी

January 24, 2025
Next Post
सांगली अर्बन बँकेच्या संचालक पदी निवड झाल्या बद्दल श्रीकांत देशपांडे यांचा भव्य सत्कार

सांगली अर्बन बँकेच्या संचालक पदी निवड झाल्या बद्दल श्रीकांत देशपांडे यांचा भव्य सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In