बदनापूर
बदनापूर शहरातील वार्ड क्रमांक 13 मध्ये नगर पंचायत ने सिमेंट रस्ते,नाल्यांचे काम न केल्याने पावसाळ्यात सर्वत्र चिखल पसरला असून नागरिकांना सर्कशी सारखी कसरत करीत रस्त्यावरून ये जा करावी लागत आहे मात्र नगर सेवक व नगर पंचायत याकडे सोयीस्कर पणे दुर्लक्ष करीत आहे असा आरोप या वार्डातील समाजसेवक जावेद वहाब कुरेशी यांनी केला आहे.
बदनापूर शहरातील हुसेननगर हा भाग वार्ड क्रमांक 13 मध्ये आहे या वार्डात नगर पंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे,या वार्डात सिमेंट रस्ते व नाल्यांचे काम करणे आवश्यक असतांना नगर पंचायत याकडे लक्ष द्यायला तय्यार नाही,या भागात सिमेंट रस्त्यांची कामे न झाल्याने पावसाळ्यात होणाऱ्या पावसामुळे सांडपाणी व इतर पाणी रस्त्यावर तुडुंब भरून वाहत असून या ठिकाणी नागरिकांना चिखल तुडवीत ये जा करावी लागत आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे ,नगरसेवक व नगर पंचायत बघ्याची भूमिका बजावत असून सत्ता असतांना या वार्डाचा विकास होत नाही यापेक्षा दुसरे दुर्दैव काय असा प्रश्न देखील जावेद कुरेशी यांनी उपस्थित केला.









