बदनापुर / प्रतिनिधी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सामाजिक अर्थसहाय्य योजना अंतर्गत या योजना राबविल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना यांसारख्या विविध योजना शासनामार्फत राबविल्या जातात. कोरोनामुळे अनेक दिव्यांग रोजगारापासून वंचित आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे; तसेच दिव्यांगांचा स्थानिक स्वराज्य संस्थांकडे असलेला पाच टक्के राखीव निधी अनेक ग्रामपंचायतींनी, यांनी वाटप केला नाही. दिव्यांगाच्या स्वतंत्र अंत्योदय शिधापत्रिका तयार करण्यात याव्या. यांसह मानधन पंचमीपूर्वी तत्काळ खात्यावर जमा करावे, अशी मागणी प्रहार अपंग क्रांतीचे बदनापुर जावेदखान पठण यांनी केली आहे.









