जालना / तुकाराम राठोड
रविवार रोजी विरेगाव कल्याणी नदीपात्रात लहान मूलाचा पाण्यात बूडून मृत्यू झाला होता.आ.कैलास गोरट्याल यांच्या हस्ते चार लक्ष रूपये धनादेश देवून संतोष राठोड व कूटूबियांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली.हि घटना तहसिलदार श्रिकांत भूजबळ यांना कळवताच त्यांनी तत्काळ सिस्टमडंळ पाठवून पंचनामे करून सर्व प्रक्रिया करण्यासाठी आदेश दिले होते.
या मध्ये दहिफळ येथील सरपंच यूवराज राठोड व विरेगाव येथिल सरपंच अमोलभैय्या जाधव यांनी सर्व परिस्थिती हतळत पूढिल प्रक्रिया पूर्ण केली.तसेच मौजपूरी येथिल नेटके साहेब,गोडबोले साहेब व विरेगाव तलाठी लांडगे मॅडम यांनी सर्व परिस्थिती लक्षात घेऊन सर्व माहिती तहसीलदार यांना कळवली.तहसिलदार यांनी तत्काळ दखल घेऊन आपत्ती व्यवस्थापन आर्थिक नियोजनाच्या मदतीने आठ दिवसांच्या आत आर्थिक मदत करण्यासाठी सहकार्य केले.
यामध्ये मा.आरोग्यमंत्री राजेशभैय्या टोपे यांच्या सांगण्यानुसार त्यांचे पी.ए.शिंदे यांनी तहसिलदार यांना लक्षवेधी मदत करण्यासाठी संबोधित केले.तसेच जालना मतदारसंघाचे विद्यमान आमदार कैलास गोरट्यांल यांनी दहिफळ येथिल सरपंच व नागरीक यांच्या सांगण्यानुसार तहसिलदार यांना वेळोवेळी संपर्क साधला.आज तहसिलदार कार्यालय येथे कैलाससेट गोरट्यांल सरपंच यूवराज राठोड तहसिलदार श्रिकांत भूजबळ तसेच राम सावंत,विनोद यादव,ज्ञानेश्वर डूकरे व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत चार लक्ष रूपयाचा धनादेश देण्यात आला आहे.









