बदनापूर नगरपंचायत हद्दीत एकुण १७ वार्ड असून, त्यापैकी काही वार्डात विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. परंतु उर्वरित वार्डात विकास कामे मंजूर का करण्यात आले नाही? त्या वार्डात भाजचे नगरसेवक नाही म्हणून उर्वरित वार्डात विकास कामे मंजूर करण्यात आले नसल्याचे सुज्ञ नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे. ही गोष्ट नागरिकांच्या समस्या वाढवणारी आहे. याकडे मुख्याधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषदेचे अध्यक्ष ॲड. अकरमखान पठाण यांनी केली आहे.







