तुकाराम राठोड,जालना
जालना-श्रीकृष्ण,रुक्मिणी नगर मधील शिक्षक कॉलनीतील कोपऱ्यावर बरेच दिवस झाले हा लाईट लटकला असून,अनेक वेळा पालिका प्रशासनाला सांगूनही बदल नाही,त्यांना सांगितले असता ते म्हणतात आमच्याकडे लाईट नाही व हा प्रायव्हेट लाईट असल्यामुळे आम्ही लाईट बसू शकत नाही, असे सांगतात तर काही ठिकाणी काम नसताना दोन-दोन,तीन-तीन लाईट खांबेवर आहे.या ठिकाणी एक लाईट सुद्धा बदलल्या जात नाही.तरी याकडे कोणी अधिकारी,प्रतिनिधी लक्ष देईलका? व कॉलनी वासी होणाऱ्यांची दुरावस्था कोणी थांबेल का?तसेच अनेक ठिकाणी अंडरग्राउंड ड्रेनेज चे काम झाले. परंतु श्रीकृष्ण,रुक्मिणी नगर येथील सोनसळे सरांच्या घरापासून तर भक्कडजींच्या घरापर्यंत अंडरग्राउंड चे काम झाले नसून,नाल्याची दुर्गंधी सुटत आहे,नाल्यातून मोठाले साप बाहेर येत आहे,पवसामुळे नाली पूर्णपणे पाणी तुंबले आहे.यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नागरिकांचे आरोग्य धोकादायक आले असून,याकडे प्रशासनाने, लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.







