बदनापूर / प्रतिनिधी
औरंगाबाद हुन मोटार सायकल वर बदनापूर ला येत असतांना मोटार सायकल ला अज्ञात वाहनाची धडक झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जख्मी झाल्याची घटना सायंकाळी 7वाजे दरम्यान घडली आहे . शेख बाबा भिकन वय 28 वर्ष असे मयताचे नाव आहे.
औरंगाबाद हुन मोटार सायकल क्रमांक एम एच 21 बी जे 7686 वर शेख बाबा भिकन वय 28 रा. बदनापूर व शेख अशपाक सुलतान वय 26 रा. बदनापूर हे दोघे बदनापूर ला येत असतांना बदनापूर हत्ती नाल्या जवळ पाठी मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने मोटार सायकल वर पाठी मागे बसलेला शेख इम्रान उर्फ बाबा भिकन हा विरुद्ध दिशेला फेकल्या गेला आणि जालना कडून औरंगाबाद कडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाखाली चिरडल्या गेल्याने जागीच मृत्यू झाला तर शेख अशपाक हा गंभीर जख्मी झाला असून उपचारासाठी औरंगाबाद येथे रुग्णालयात पाठविण्यात आले, सदर घटना 25 सप्टेंबर रोजी 7 वाजे सुमारास घडली.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शिवाजी बनटेवाड, सह्याक पोलीस निरीक्षक रामोड जनार्धन, चंद्रशेखर मांटे, शिवाजी भगत, शेख इस्माईल यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने नागरिकांच्या सहाय्याने जखमीला दवाखाण्यात रवाना केले व मयत शेख बाबा यांचे प्रेत पोस्टमार्तम साठी बदनापूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले,









अभिनंदन