प्रतिनिधी:(जालना)तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून,सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.अशी नागरिकांची दिवसेंदिवस मागणी होत.तरीपण सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे.सदर रस्त्याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष होत असून,बांधकाम विभागाचे अधिकारी झोपेचे सोंग घेत आहे. की काय अशी भावना नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे
.तसेच मागील बऱ्याच दिवसापासून सावंगी-पाहेगाव चौफुली ते नेर व पाथरूड ते रामनगर रस्त्याची अवस्था अतिशय खराब व दर्जाची झाली आहे.त्यामुळे रस्त्यावर जागो-जागी खड्ड्यामध्ये पाणीच पाणी साचले आहे.तसेच ऐजा करणाऱ्या प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.तसेच एसटी बस सेवा देखील मागील बऱ्याच दिवसापासून बंद आहे.सदर ठिकाणी ये जा करणाऱ्या प्रवासांना खाजगी वाहनांना जास्त प्रमाणात प्रवाशी भाडा द्यावा लागत आहे.तसेच ग्रामीण भागातील ऐजा करणारे नागरिकांना व वाहनधारकांना याचा फार मोठा त्रास होत असून,याचा सर्वसामान्य जनतेला नाहक भुर्दंड त्यांना सोसावं लागत आहे.या रस्त्यावरुन दवाखान्यामध्ये जाण्यासाठी नागरिकांना वेळ लागत असल्यामुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे.
त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या भागातील रस्त्याची त्वरित देखभाल व डाग करावी व नवीन रस्त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावे अशी मागणी भाजपा भटके विमुक्त आघाडीचे तालुकाध्यक्ष तुकाराम राठोड,शाखाध्यक्ष राजू राठोड,पांडुरंग आहेरकर,संजय रंधवे,सूर्यकांत देशमुख,रमेश राठोड,राधाकिसन बावणे व येथील नागरिकांकडून होत आहे.अन्यथा आपल्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन केली जाईल असा इशाराही राठोड यांनी दिला आहे.








