बदनापूर
बदनापूर तालुक्यातील कंडारी गावाच्या शिवारातील डाबका तांडा येथील बबन पोमा चव्हाण याच्या कापसाच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजीराव बंटेवाड यांना मिळाली असता त्यांनी वरिष्ठांना सदर माहिती देऊन सापडा रचला व शेतात जाऊन धाड टाकली असता गांजाची ५४ झाडे आढळून आली असून तब्बल १४ लाख किमतीचे गांजा पोलिसांनी जप्त केला व आरोपीस अटक करून बदनापूर न्यायालयात हजर करण्यात आले.
तालुक्यातील कंडारी गावाच्या शिवारातील डांबका तांडा येथील बबन चव्हाण यांच्या शेतात कप्समध्ये गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत बदनापूर पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांना २७ ओक्टोम्बर रोजी मिळाली असता सदर माहिती त्यांनी पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांना दिली असता पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी कृषी अधिकारी,नायब तहसीलदार यांच्यासह पथकाने कंडारी शिवारातील डांबका तांडा येथे जाऊन सापडा रचला असता बबन पोमा चव्हाण यांच्या शेतात कापूस पिकामध्ये गांजाची झाडे आढळून आली.
कापूस पिकामध्ये गांजाची झाडे आढळून आल्याने पथक अवाक झाले व पूर्ण शेताची पाहणी केली असता शेतात गांजाची ५८ झाडे आढळून आली ,या गांजाची ओल्या झाडाचे वजन 70 किलो 900 ग्राम वजन असून, त्याची किंमत अंदाजे 14 लाख आहे पोलिसांनी झाडासह आरोपी बबन चव्हाण यांना ताब्यात घेऊन अटक केली असून २८ ओक्टोम्बर रोजी बदनापूर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने आरोपीस ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे,पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजीराव बंटेवाड यांच्यासह नायब तहसिलदार रामेश्वर दळवी, कृषी अधिकारी बनसोड, सहायक पोलीस निरीक्षक साईनाथ रामोड, सहायक फौजदार जारवाल, बुनगे, पोहेकाँ. जारवाल, घोडके, पोकॉं. भवरे, निकम, महिला पोकॉं. जारवाल पोलीस पथकाने ही कामगिरी केली आहे.








