प्रतिनिधी:(जालना)तालुक्यातील सावंगी तलाव येथील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल योजने चे वंचित लाभार्थी-रवी डिगांबर खराडे,विष्णू कारभारी राऊत,गोपीनाथ किसन राऊत,मदन रूस्तूम राजकर,मच्छिंद्र गोपीनाथ गवळी,विष्णू उत्तम हरकळ,कानिफनाथ उत्तमनाथ धायडे या सर्वांनी मिळून विभागीय आयुक्त संभाजीनगर औरंगाबाद यांना दिलेल्या निवेदनाद्वारे अशी मागणी केली आहे की,आम्ही सर्व मागासवर्गीय प्रवर्गातील असून,आज पर्यंत आम्हाला पक्के घर नाही.आमची परिस्थिती अत्यंत बिकट असून,आम्ही अक्षरशः झोपडीच्या घरामध्ये राहतो.आम्ही स्वखर्चाने घर बांधण्यास असमर्थ आहे. व आम्हाला शासनाच्या योजनेचा घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी पात्र असूनही ग्रामपंचायत सावंगी तलाव चे सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी व भ्रष्टाचारी कारभारामुळे आम्हाला आतापर्यंत शासकीय घरकुल लाभ मिळालेल्या नाही.तसेच सावंगी तलाव या गावामध्ये ज्या गावकऱ्याची पक्के घरी आहेत व ते सधन असून,शासकीय घरकुलाच्या लाभास सर्वार्थाने पात्र आहे.असे भासविले आहेत.परंतु गावकरी व ज्यांच्या कुटुंबातील सदस्यास यापूर्वी घरकुलाचे लाभ देण्यात आलेला आहे.अशा अपात्र लाभार्थ्यांना सरपंच व ग्रामसेवक यांनी त्यांच्याकडून प्रत्येकी दहा ते पंधरा हजार रुपये घेऊन आर्थिक व्यवहार केलेला आहे.अशा अपात्र लाभार्थ्यांना शासकीय घरकुलाचा लाभ दिलेला आहे.तसेच आम्ही सर्व लाभार्थी गरीब व निर्धन असल्याने सरपंच व ग्रामसेवक यांच्या मागणीप्रमाणे पैसे देऊ शकलो नाही.म्हणून आमचे सर्वांचे नाव घरकुल लाभार्थी यादीतून वगळून आम्हाला या योजनेपासून वंचित केली आहे.त्यामुळे विभागीय आयुक्त साहेबांनी मौजे सावंगी तलाव येथील ग्रामपंचायत अंतर्गत घरकुलाच्या वितरणामध्ये किंवा मंजुरी मध्ये झालेल्या आर्थिक व्यवहाराची व भ्रष्टाचाराची आणी पक्ष पाती धोरणाची सखोल चौकशी करावी आणि आम्हा लाभार्थ्यांना शासकीय घरकुलाचा लाभ देण्यात यावा व तात्काळ आदेश देण्याची कृपा करावी ही विनंती.या निवेदनावर- रवी खराडे,विष्णू राऊत,गोपीनाथ राऊत,मदन राजकर,मच्छिंद्र गवळी,विष्णू हरकळ,कानिफनाथ धायडे या सर्व लाभार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.








