भोकरदन शेख जफर :-
भोकरदन तालुक्यातील दानापूर ग्रामपंचायत ग्रामनिधी अंतर्गत ५ टक्के अपंग निधीचे वाटप ०३ डिसेंबर रोजी सरपंच शकीलाबी मोबिन शेख,उपसरपंच अनिल शिंदे व ग्रामसेवाक सुभाष बावस्कर यांच्या हस्ते अपंगांना कंबल चे वाटप करण्यात आले.दानापूर मध्ये ४० अपंग लाभार्थी असून ग्रामपंचायत च्या ग्रामनिधी मधून ५ टक्के निधीचे कंबल या सर्व लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.
पाठीमागील वर्षत किराणा किटचे वाटप करण्यात आले होते त्या मध्ये घरगूती साहित्य देण्यात आले होते.या वेळी ग्रामसेवक सुभाष बावस्कर,सरपंच शकीलाबी मोबिन,उपसरपंच अनिल शिंदे,ग्रामपंचायत सदस्य शेख जफर, आंबदास कनगरे,अजहर शेख, शेख जहीर,,सामाजिक कार्यकर्ते अन्वर शेख व भूषण पवार , योगेश वैद्य ,रमेश कनगरे,राजेंद्र दळवी यांच्या सह सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
तसेच अपंग लाभार्थी पांडे सविता पुंजाराम,सय्यद युसूफ बुढन,शिंदे सरला अशोक,अनिस इब्राहिम शेख, शेख मोसीन रब्बानी,शेख जमील रहेमान आदी उपस्थित होते.








