तुकाराम राठोड /जालना-
जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे काही प्रमाणात रब्बी हंगामातील पेरणी झालेली आहे.तर काही ठिकाणी जमिनीत ओल नसल्यामुळे झालेली नाही. ज्या ठिकाणी पेरणी झाली आहे त्या ठिकाणी ज्वारीचे पीक उगवून आले आहे.त्यालाच कीड किंवा मर रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे.त्यामुळे ज्वारी चे पाने किड खात आहे.यामुळे शेतकरी परेशान झाला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी काय उपाय योजना करावे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहेत.तसेच जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सल्ला व मार्गदर्शन करावे त्यामुळं रोगराईला आळा बसेल त्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.









