बदनापूर
आमच्या घराचा दरवाजा का तोडला या क्षुल्ल्कक कारणावरून एका ३५ वर्षीय तरुणास चौघांनी बेदम मारहाण करून तीष्ण हत्याराने छातीत व बंगले वर खून केल्याची घटना तालुक्यातील जवसगाव येथे काल रात्री घडली असून संतोष शिवनाथ पडूळ असे आहे,या प्रकरणी बदनापूर पोलिसात ८ मे रोजी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशेष म्हणजे दुपारी मयत व एका दारू विक्रेत्यांमध्ये वाद झाला होता तदनंतर सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास मयत संतोष पडूळ याने आरोपींच्या घराचा दरवाजा तोडला. गावात राजरोसपणे दारू विक्री सुरु असल्याने अश्या घटना घडतात असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
बदनापूर तालुक्यातील जवसगाव हे ३ ते ४ हजार लोकसंख्येचे गाव आहे ,या गावात फळबागा मोठ्या प्रमाणात असल्याने जिल्ह्यात नावारूपास आलेले आहे ,परंतु गावात अवैधरित्या दारू विक्री व्यवसाय राजरोसपणे सुरु असल्याने व पोलीस प्रशासन त्याकडे कानाडोळा करीत असल्याने गावाचे नाव बदनाम होत आहे, ७ मे रोजी गावातील ३५ वर्षीय तरुण संतोष शिवनाथ पडूळ हे ३:३० ते ४ वाजेच्या सुमारास दारू विक्रेते बळीराम अंकुश गारखेडे यांच्याकडे दारू पिण्यास गेला त्या ठिकाणी दोघात किरकोळ वाद देखील झाला तद्नंतर संतोष हा आपल्या घरी गेला व सायंकाळी ७ :३० वाजेच्या सुमारास पत्नी,वडील,आई सोबत बसलेला असतांना रागाच्या भरात शेजारी असलेल्या गणेश भानुदास पडूळ यांच्या घराचा दरवाजा तोडला.
आमच्या घराचा दरवाजा का तोडला म्हणून गणेश पडूळ ,भानुदास पडूळ ,बालाजी पडूळ ,दत्ता चव्हाण हे संतोषच्या घरासमोर येऊन विचारणा करत गणेश पडूळ याने संतोष पडूळ यांच्या घराचा दरवाजा तोडला असता संतोष पडूळ याने गणेश च्या हातातील कोयता हिसकावला आणि लगेच गणेश ने हातातल्या लोखंडी रॉडने संतोषच्या पोटावर वार केला तसेच बगला जवळ वार केल्याने संतोष खाली कोसळला आणि रक्त वाहू लागले सोडवासोडव करीत असतांना भानुदास पडूळ ,बालाजी पडूळ ,दत्ता चव्हाण यांनी लाथाबुक्क्याने मारहाण केली तसेच मला पण शिवीगाळ केली अशी तक्रार मयत संतोष पडूळ यांची पत्नी नंदा पडूळ यांनी केली असता सदर तक्रारीवरून बदनापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 302,323,504,506,34 भादवी. अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपस पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब खारडे हे करीत आहे.
मयत शेती करायचा
मयत संतोष पडूळ यांचा लग्न २०१३ मध्ये नंदा यांच्या सोबत धर्मच्या रितीरिवाजाप्रमाणे झालेला असून मयतास दोन मुली आहेत अश्विनी वय ११ व भावना वय ३ वर्ष असे त्यांची नावे आहेत ,संतोष हा शेती करत होता व पूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरच होती.
दारू व्यवसाय बंद करा
बदनापूर तालुक्यातील जवसगाव हे फळबागांमुळे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे परंतु या गावात राजरोसपणे अवैधरित्या दारू विक्री व्यवसाय चालतो याकडे जाणीवपूर्वक पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे,वारंवार ग्रामस्थ दारू विक्री बंद करण्याची मागणी करतात मात्र कारवाई होत नाही या दारूमुळे गावात अनेकदा वाद विवाद होतात असा आरोप ग्रामस्थांनी केला.









