तुकाराम राठोड / जालना
ज्यांना विधानसभा मतदारसंघातील 160 कार्यकर्ते पंढरपूर वारीला दिनांक 07/07/2024 रोजी सायंकाळी आठ वाजता मार्गस्थ झाले होते.तसेच मागील तीन वर्षापासून भास्कर आबा दानवे यांच्या नेतृत्वात माऊली दिंडीमध्ये पायी प्रवास करण्यासाठी जालना तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते तथा पदाधिकारी घेऊन जात आहे.दिनांक 08/07/2024 रोजी सकाळी आळंदीला पोहोचलो व येथील माऊलीच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन थिऊर महागणपतीचे दर्शन घेतले.तसेच जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेऊन त्यानंतर माऊलीच्या दिंडीमध्ये तरडगाव ते फलटण असा पंधरा ते वीस किलोमीटर पायी प्रवास केला.व
दि.09/07/2024 रोजी विठ्ठल व रुक्माई चे दर्शन घेऊन,पंढरपूर येथील प्रसिद्ध भक्तनिवास येथे विश्रांती घेतले.दि.10/07/2024 रोजी सकाळी चहा-नाश्ता करून तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन सायंकाळी नऊ वाजता जालना येथे सुखरूप घरी पोहोचलो.तसेच
ही दिंडी भास्कर आबा दानवे यांच्या नेतृत्वात अतिशय खेळीमेळीच्या व भक्तीमय वातावरणात पार पडली आहे.या वारीसाठी भास्कर आबा दानवे,गोवर्धन कोल्हे,धनराज काबलिये,वसंतराव शिंदे,अनिल सरकटे,संजय डोंगरे,मुकेश चव्हाण,छबुराव राठोड यांनी परिश्रम घेतले आहे.तसेच मोहिते ट्रॅव्हल्स चे मालक यांनी वारकऱ्यांना व कार्यकर्त्यांना वेळेवर भोजनाची व्यवस्था केल्यामुळे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे आभार मानले.









