प्रतिनिधी | बदनापूर
वरुडी कडून बदनापूर कडे येणाऱ्या मोटारसायकल ला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीसवार दोघे जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना सकाळी छत्रपती संभाजीनगर – बदनापूर मार्गांवर वरुडी फाट्याजवळ घडली.
बदनापूर तालुक्यातील वरुडी काकडे वस्तीवर राहणारे कलिम अब्दुल नबी व नाजीम हमीद पठान हे युवक मोटारसायकल वर शुक्रवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास बदनापूर ला निघाले असता पाठीमागून भरघाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने महामार्ग रस्त्यावर दोघे जण फेकल्या गेले आणि गंभीर दुखपत होऊन जागीच गतप्राण झाले. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब सहाणे व जमादार बाबासाहेब जऱ्हाड यांनी भेट देऊन मृत्यूदेह पुढील कारवाईसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवलं.
सदर प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाविरुद्ध नोंद घेण्यात आली आहे.









