बदनापुर / प्रतिनिधी /
बदनापुर पोलीस ठाण्यातील शबान जलाल तडवी,,नेमनुक पोलीस ठाणे बदनापूर जि. यांनी फीर्याद दिली की
दिनांक 14/08/2024. रोजी संध्याकाळी सात वाजेचे सुमारास मी पोलीस ठाणे बदनापूर येथे गोपनीय शाखेमध्ये कार्यालयीन कामकाज करत आसतांना पोलीस स्टेशनचे बाहेर रोडवर एक इसम हातात चाकु घेवून फीरत आहे असे रोडवर आरडाओरडा करत आसतांना आवाज आल्याने आम्ही सदर माहीती मा.पोनि.सो. यांना कळवून मा.पोनि.सो. यांचे आदेशाने मी व पोउपनि बी.एस. खाडे साहेब. पोहेको/1031.बी.एस.ज-हाड, पोकों/342 पुनमसिग गोलवाल असे मा.पोनि. सो, यांचे आदेशाने आम्ही पोलीस ठाण्याच्या बाहेर जाऊन हातात चाकू घेऊन हिडत आसलेल्या सदर इसमास पोउपनि बी.एस.खाडे, यांनी त्यास पकडले.
सदर इसमाच्या हातातील चाकु ताब्यात घेवून सदर इसमास पोलीस ठाणे बदनापूर येथे घेवून आलो सदर इसमास मा.पो.नि.सो. यांचे समक्ष पोउपनि बी. एस. खाडे यांनी त्या इसमास त्यांचे नाव गाव विचारले आसता त्याने त्याचे नाव नितीन दिलीप कदम, वय 25 वर्षे, व्यवसाय शिक्षण, रा. दावलवाडी, ता. बदनापूर, जि. जालना, असे सांगीतले त्याचे ताब्यातून एक चाकु दोन पंचा समक्ष जप्त केला त्यांचे वर्णन खालील प्रमाणे 300 रू : ज्यात एक लोखडी चाकू ज्याची लांबी अदाजे एक फुट रूदि एक इंच जुना वापरता की, अ.असा वरील वर्णनाचा चाकू नमुद इसमाचे ताब्यात मीळून आल्याने तो चाकू पोउपनि बी.एस. खाडे. यांनी दोन पंचा समक्ष ताब्यात घेवून नमुद इसमास ताब्यात घेवून पोलीस ठाणे बदनापूर येथे कलम 4/25. भारतीय हत्यार कायदा प्रमाणे कायदेशिर कारवाई करून सदर इसमास अटक करण्यात आली आहे आखेर पोउपनि बी.एस. खाडे यांच्या सर्तेके मुळे एका इसमाचा जिव जाता जाता वाचला.
पुढील तपास पो कॉ रणजीत मोरे हे करीत आहे .पोउपनि बी.एस. खाडे यांची सर्वत्र कौतुक होत आहे
दिनांक 14/08/2024. रोजी संध्याकाळी सात वाजेचे सुमारास आम्ही सर्व पोलीस कर्मचारी ठाण्यात कामकाज करीत असताना आम्हाला बाहेर काहीतरी होत असल्याचे कळले बाहेर येऊन बघितले असता एक इसम हातात धारदार शस्त्र घेऊन दुसऱ्या इसमास रोडवर पाडून त्यास घाव मारण्याच्या तयारीत असताना मी त्याला पकडले व पोलीस ठाण्यात आणले एका इसमाचा जिव जाता जाता वाचला .
पोउपनि बी.एस.खाडे पोलीस ठाणे बदनापुर








