बदनापूर / आदिल खान
मालवण येथिल छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी तर्फे महायुती सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला बदनापूर शहरातील छत्रपति शिवाजी महाराज चौक येथे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला,
या वेळी शासनाच्या ढिसाळ कारभारा विषयी नारेबाजी करण्यात आली यात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बबलू (रुपकुमार) चौधरी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सुभाष मगरे, माजी नगरसेवक फिरोज खान, काँग्रेस नेते शेख अनवर अत्तार, बदनापूर शहर अध्यक्ष जावेद बागवान, जिल्हा उपाध्यक्ष शेख युनूस भय्या सेतू, नगरसेवक विनोद साबळे, युवा नेते शेख शफी इनामदार, नासेर भाई, माजी नगरसेवक शेख जावेद कुरेशी, मोबिन भाई, बदनापूर तालुका अध्यक्ष अनुसूचित विभागाचे विलास साबळे यांच्यासाह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.









