• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपला जिल्हा

“रयतेचे राजे राजर्षी शाहू महाराजांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन

गावमत by गावमत
May 7, 2022
in आपला जिल्हा
0
0
SHARES
4
VIEWS

“रयतेचे राजे राजर्षी शाहू महाराजांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन

जालना / तुकाराम राठोड

कोल्हापूरचे महाराज छत्रपती शाहू महाराज हे जरी कोल्हापूर संस्थानचे अधिपती होते तरी त्यांना १९०० साली घडलेल्या वेदोक्त प्रकरणाच्या वेळेपासून ब्राम्हण समाजाने नुसते जेरीस आणले होते.थोडक्यात वेदोक्त प्रकरण सांगावयाचे म्हणजे ,दरवर्षी कार्तिक एकादशीला भरणाऱ्या यात्रेदिवशी कोल्हापूरला पंचगंगा नदीवर छत्रपती शाहू महाराज सकाळी आपल्या परिवारासह स्नानाला जात असत. त्यावेळी, महाराज स्नान करीत असता , महाराजांचा ब्राम्हण उपाध्याय स्वतः स्नान करून मंत्र म्हणत असे. परंतु १९०० साली सदर उपाध्याय वेळेवर आला नाही , त्याने थंडी वाजते या सबबीवर स्नान टाळले व मंत्र म्हणावयाचे ते वैदिक मंत्र न म्हणता ‘ पुराणातील मंत्र म्हणेन , कारण महाराज तुम्ही शुद्र असल्यामुळे तुम्हास वैदिक मंत्र म्हणण्याचा अधिकार नाही .’असे तो महाराजांनाच सांगू लागला . शेवटी त्याने वैदिक मंत्र म्हटले नाही. महाराजांनी त्याला बडतर्फ केले . व नवा उपाधाय्य नेमला पंरतु नव्या उपाध्यायावर सर्व ब्राम्हण समाजाने बहिष्कार घातला .जलाशयावर ब्राम्हण तरुण दगडफेक करू लागले . महाराजांविरुद्ध ‘केसरी’ आदि ब्राम्हणी वृत्तपत्रातून बेफाम टीका सुरु झाली त्यांची ब्राम्हण वस्तीत निंदा चालविली . ते महाराज जरी होते तरी त्यांना ‘ स्वातंत्र्य ‘ नव्हते असे महाराजांना वाटे मत स्वातंत्र्य म्हणजे काय व व्यक्तीस्वातंत्र्याची जरुरी किती आहे याची अतिशय तीव्र जाणीव त्यांना झालेली होती.
यावरूनच ते नेहमी विचार करीत असत कि एक महाराज असून आपली स्थिती अशी आहे तर अस्पृश्य लोकांची व भीमरावांची स्थिती काय असेल याची कल्पना त्यांना येत होती.
छत्रपती शाहू महाराज व भीमराव हे ऐतिहासिक गरज म्हणून एकत्र आले होते. शाहू महाराज छत्रपती असून देखील भीमराव परेलला ज्या चाळीमध्ये रहात असत तेथे स्वतः मोटार घेऊन त्यांच्या भेटीला येत असत . त्यांच्या मैत्रीचे दृश्य स्वरूप मार्च १९२० मध्ये कोल्हापूर जिल्यातील माणगाव येथे जि परिषद झाली व ज्या परिषदेचे अध्यक्ष भीमराव होते व पाहुणे शाहू महारज होते, त्या परिषदेने प्रकट झाले . ह्या परिषदेत शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिजात पुढारपणाची घोषणा केली , ” हेच तुमचे खरे पुढारी आहेत; ते तुमचाच नव्हे तर तुम्हा आम्हा सर्वांचा उद्धार करतील अशा प्रकारचे त्यांच्या अंगी गुण आहेत .”अशी घोषणा करणारे छत्रपती शाहू महाराज , भारतातील नव्हे तर जगातील एकमेव द्रष्टे पुरुष होते. एक राजा असूनही त्यांचे मन किती थोर, दयाळू व या सर्वात अधिक म्हणजे किती दिलदार होते, याची प्रचीती जगाला आल्याशिवाय राहणार नाही.
त्यांनी १९०२ मध्ये क्रांतीचा जाहीरनामा काढला त्यात त्यांनी मागासलेल्या वर्गाना ५० % आरक्षण व राखीव जागा देण्याचा हुकुम केला.राखीव जागांचे धोरण अंमलात आणणारे राजर्षी शाहू महाराज हे भारतातील पहिले राज्यकर्त्ये ठरले.
रयतेचा राजा राजर्षी शाहू महाराज यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम .

Related Posts

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार
आपला जिल्हा

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

August 11, 2025
मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे
आपला जिल्हा

मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे

August 9, 2025
किरकोळ कारणावरून बाप, लेकाचा तीष्ण हत्याराने खून
आपला जिल्हा

किरकोळ कारणावरून बाप, लेकाचा तीष्ण हत्याराने खून

May 13, 2025
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेश वाटप!
आपला जिल्हा

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेश वाटप!

March 22, 2025
एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?
आपला जिल्हा

एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?

March 22, 2025
दगडवाडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात 188 रुग्णांची तपासणी
आपला जिल्हा

दगडवाडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात 188 रुग्णांची तपासणी

January 24, 2025
Next Post

अर्थशास्त्र नियोजन मंडळाचे उदघाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In