बदनापूर / प्रतिनिधी
निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट बदनापूर न्यू लाईफ केअर हॉस्पिटल व चिकलठाणा लायन्स नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने बदनापूर पाथ्रीकर कंपास मध्ये गुरुवारी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असता या शिबिरात 379 रुग्नांची नेत्र तपासणी करण्यात आली असून यामध्ये 80 रुग्ण मोतीबिंदू चे आढळून आल्याने त्यांना शस्त्रक्रियेसाठी तारीख देण्यात आली.
निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टच्या माध्यमातून डॉ.देवेश पाथ्रीकर यांनी बदनापूर तालुक्यात न्यू लाईफ केअर हॉस्पिटल व चिकलठाणा लायन्स नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यास मागील दोन महिन्यापासून सुरवात केलेली आहे,या उपक्रमामुळे ग्रामीण बहागातील नागरिकांना चांगला फायदा होत असल्याने विविध ठिकाणी आयोजित शिबिरात मोठ्या प्रमाणात नेत्र तपासणीसाठी रुग्ण सहभागी होत आहे,१२ मे रोजी बदनापूर शहरातील नागरिकांसाठी पाथ्रीकर कॅम्पस मध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून आली. तब्बल 379 रुग्नांची नेत्र तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये 80 रुग्ण मोतीबिंदूचे आढळून आल्याने त्यांना शस्त्रक्रियेसाठी तारीख देण्यात आली आहे.
पाथ्रीकर कॅम्पस मध्ये आयोजित शिबीर यशस्वी करण्यासाठी बदनापूर येथील जगन्नाथ बारगजे,गोरखनाथ खैरे,शेख मतीन,बाबासाहेब कऱ्हाळे,शेख रियाज,ताराचंद फुलमाळी,नंदकिशोर दाभाडे,सय्यद मुजम्मिल,सुभाष माग्रे,अब्दुल रहेमान,शेख अन्वर,विक्की रांगडे,कायंदे,बाबुराव दाभाडे,मनोज गरबडे,प्रदीप साबळे,रियाज मॅक्स ,सचिन निकम,शेख समीर उपनगराध्यक्ष,शेख इकबाल आदींनी परिश्रम घेतल्याने संस्थेचे अध्यक्ष डॉ.दत्ताभाऊ पाथ्रीकर यांनी त्यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
यावेळी डॉ.दत्ताभाऊ पाथ्रीकर म्हणाले कि, समाजाचे काही तरी देणं लागतं म्हणून आम्ही संस्थेच्या वतीने बदनापूर तालुक्यात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शास्त्रक्रया शिबीर घेण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे विशेष म्हणजे हे कार्य डॉ.देवेश पाथ्रीकर यांच्या संकल्पेतून पुढे आलेले असून इतर गोष्टीवर खर्च न करता एक सामाजिक कार्य म्हणू संस्था नेत्र तपासणी व मोतीबिंदू शास्त्रक्रयेवर खर्च करीत असून रुगांना एक रुपया देखील खर्च करण्याची गरज नाही कारण त्यांना येणार शास्त्रकिरपासून ते घरापर्यंत पोहचे पर्यंतचा खर्च हे संस्था करीत आहे






