• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपले शहर

कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृहातील विद्यार्थिनीची आत्महत्या

गावमत by गावमत
February 6, 2025
in आपले शहर
0
कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृहातील विद्यार्थिनीची आत्महत्या
0
SHARES
798
VIEWS

प्रतिनिधी | बदनापूर
येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वस्तीगृह आहे. या वस्तीगृहाच्या पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक तीनमध्ये बारावीत शिक्षण घेणाऱ्या भिल्ल समजाच्या मुलीने आपल्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा खळबळजनक प्रकार बुधवारी रात्री उशिरा घडला. दरम्यान, सुसाईड नोट न सापडल्याने त्या मुलीने आत्महत्या का केली? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, गुरुवारी दुपारी येथील ग्रामीण रुग्णालयात मृत विद्यार्थिनीच्या पार्थिवावर उत्तरीय तपासणी करण्यात आली.
ज्योती संजय सुरासे (वय १७ रा. किन्होळा ता. बदनापूर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
बदनापूर येथील एका महाविद्यालयात ती बारावीचे शिक्षण घेत होती. मात्र राहायला ती कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या वस्तीगृहात होती. मात्र त्या मुलींनी तिला रोखले असता तिने आपण गंमत करीत असल्याचे सांगितले. मात्र नंतर त्या मुली रूममध्ये नसताना तिने रात्री साडेनऊ वाजता आपल्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या बाबत तात्काळ बदनापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुदाम भागवत यांना माहिती कळविण्यात आली. त्यानंतर फौजदार कैलास दांडगे, पोलिस मुख्य जमादार बाबासाहेब जऱ्हाड, पोलिस जमादार रियाझ पठाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्या मुलीच्या मृतदेहाला खाली काढून पुढील कार्यवाहीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. तिथे गुरुवारी दुपारी मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात आली. दरम्यान, आमची मुलगी आत्महत्या करू शकत नाही, हा प्रकार घातपाताचा असू शकतो, या संदर्भात सखोल चौकशी होत नाही, तो पर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा मुलींच्या नातेवाईकांनी घेतला होता. मात्र पोलिस निरीक्षक सुदाम भागवत यांनी आपण या घटनेची सखोल चौकशी करू, असे आश्वासन दिल्याने मुलीचे नातेवाईक अंत्यसंस्कार करण्यास तयार झाले.
या वस्तीगृहात शंभर मुली राहू शकतात. यापैकी ९२ मुलींना वस्तीगृहात प्रवेश देण्यात आला आहे. यापैकी ७५ मुली नियमित या वस्तीगृहात राहतात. मात्र बुधवारी (ता. पाच) केवळ ४० मुली उपस्थित होत्या. मुलांच्या या वस्तीगृहात एका खोलीत तीन मुली राहू शकतात, असे नियोजन करण्यात आले आहे. शिवाय सुरक्षारक्षक आणि महिला गृहपाल या वस्तीगृहावर लक्ष ठेऊन असतात. तसेच सीसीटिव्ही कमेऱ्यामार्फत देखील वस्तीगृहावर नजर ठेवण्यात येते. एव्हढे सारे साधन असताना त्या मुलीने आत्महत्या केली कशी? असा प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. अर्थात या घटनेच्या संदर्भात अद्याप कुठलेही ठोस कारण कळू शकले नाही. मात्र प्राथमिक अंदाजवरून हा प्रकार आत्महत्येचा असल्याचे दिसून येते. दरम्यान, या बाबत पोलिस निरीक्षक सुदाम भागवत आणि सहायक पोलिस निरीक्षक स्नेहा करेवाड कसून चौकशी करीत आहेत. त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता गवई आणि सोबतच्या दोन मुलींचा जवाब नोंदविला आहे.

Related Posts

बदनापूर बस स्थानक बांधकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न
आपले शहर

बदनापूर बस स्थानक बांधकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

June 3, 2023
शिवसेना खासदार फुटले ?मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुन्हा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का ; लोकसभेच्या सभापतींपुढे केली १२ सेना खासदारांची परेड, निवडणूक आयोगाकडेही जाणार
आपले शहर

आठ वर्षीय मुलाने गच्चीवर वाळू टाकल्याच्या कारणावरून एका साठ वर्षीय वृद्धाचा खून

May 31, 2023
शाईनगर व मुख्य रस्त्यांवरसुद्धा सर्वत्र घाणीचे साम्राज्य
आपले शहर

शाईनगर व मुख्य रस्त्यांवरसुद्धा सर्वत्र घाणीचे साम्राज्य

July 30, 2022
नगरपंचायतकडून विकास कामे कमी अणि सर्वसामान्य जनतेला त्रास -ॲड. अकरमखान पठाण
आपले शहर

नगरपंचायतकडून विकास कामे कमी अणि सर्वसामान्य जनतेला त्रास -ॲड. अकरमखान पठाण

July 30, 2022
आपले शहर

समाजाचे काही देणं लागतं म्हणून डॉ.देवेश पाथ्रीकर यांच्या संकल्पनेतून मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर – डॉ.दत्ताभाऊ पाथ्रीकर

May 12, 2022
आपले शहर

बदनापूर जवळ महामार्ग रस्त्यावर मोटारसायकल ला अडवून नव्वद हजार लुटले

May 9, 2022
Next Post
एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?

एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In