दाभाडी / जुलफेकार बागवान
दाभाडी (ता. बदनापुर ) येथे ग्रामपंचायतच्या वतीने रामतीर्थ सार्वजनिक स्मशान भूमी येथे श्री. खडेश्वरी बाबा (तुपेवाडी) यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या बाबत अधिक माहिती अशी की , दाभाडी येथे आजपर्यंत स्मशान भूमी न०हती परंतु हा प्रश्न ग्रा.पं.च्या वतीने तत्कालीन पालकमंत्री श्री राजेशभैय्या
टोपे यांच्याकडे मांडण्यात आला व तात्काळ त्यांनी जिल्हा नियोजन समिती फंडातून सार्वजनिक स्मशान भूमी मंजुर केली ते काम पूर्ण होऊन स्मशान भूमी अंत्ययात्रेसाठी श्री. खड़ेश्वरी बाबा यांच्या हस्ते वृक्षारोपण करून खुली करण्यात आली. यांवेळी श्री खडेश्वरी बाबा यांनी योग्य मार्गदर्शन केले , त्यांच्यासोबत ह. भ.प काकड गुरुजी हे उपस्थित होत.
या कार्यक्रमास मा. सभापती अदनान सौदागर , उपसरपंच सुरज टेकाळे ,ग्रा.पं. सदस्य जुलफेकार बागवान , भाऊसाहेब टेकाळे, कैलास बकाल , गणेश भेरे , प्रलहाद बकाल ,विष्णु टेकाळे , विनायक२ाव देशमुख ,सिताराम महाराज, गजानन महाराज , धोडीराम बकाल , तेजराव सोरमारे , जावेद सिद्दीकी , इरशाद कुरेशी , बाबाभाई यांच्या सह अनेक गांवकरी उपस्थित होते.









