बदनापूर / जावेद खान पठाण
ग्रामीण रुग्णालय बदनापूर येथे दिनांक 10/ 10/ 2022. ते दिनांक 14/ 10/ 2022. ला तालुकास्तरीय दिव्यांग शिबिर घेण्यात आले होते. यामध्ये एकूण 859 दिव्यांग विद्यार्थ्यांचीतपासणी करण्यात आली. शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील एकूण संख्या 85 होती. या शिबिराला डॉ. वाडीकर सर, डॉ.जायभाय,वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर बडोले सर डॉ.ओम ढाकणे, डॉ. खान सर, डॉ. पडूळ सर, डॉ. हाश्मी सर,यांचे मोलाचे योगदान लाभले. तसेच पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी श्री.नारायण कुमावत सर तसेच समावेशित शिक्षण विभाग बदनापूर सर्व कर्मचारी वृंद, डाटा ऑपरेटर नयनकुमार घाडगे उपस्थित होते. अशाप्रकारे पाच दिवसीय शिबिर संपन्न झाले.
तालुका समन्वयक समावेशित शिक्षण विभाग, श्रीमती, व्ही एच इंगोलेमॅडम, व श्री. एस एल मदीकुंटावार. विशेष शिक्षिका पठाण मॅडम शेख मॅडम व श्री.टी एन गिरीशेट्टी, चव्हाण ए बी,








