बदनापूर
आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ .बदनापूर येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक चार मध्ये सुरु झाले असून नगरसेवक इकबाल शेख यांच्या हस्ते वाटप सुरु करण्यात आले.
आनंदाचा शिधा वाटपाचा सुभारंभ स्वस्त धान्य दुकानदार आसेफ पठाण यांनी सकाळीच दुकान उघडून सुरु केले, नगरसेवक इकबाल शेख, माजी नगरसेवक वजीर शेख यांच्या हस्ते शिधापत्रिका धारकांना करण्यात आला, यावेळी जालना जिल्हा प्रेस कौन्सील ऑफ महाराष्ट्र चे जिल्हा उपाध्यक्ष सय्यद रफिक, याकिन शेख, विनोद साबळे, नरेंद्र साबळे, शेख मुजीब, आदी उपस्थित होते.








