तुकाराम राठोड
प्रतिनिधी:(जालना)
तालुक्यातील पाहेगाव येथील शेतकरी भानुदास शेळके वय ७० वर्ष यांनी आज दि.२९/१०/२०२२ रोजी शनिवारी संध्याकाळी चार ते पाच दरम्यान आपल्या शेतातील झाडाला दोरी बांधून आत्महत्या केली आहे.
याबाबत शेवली येथील पोलिसांनी येऊन पंचनामा केला आहे.त्यांचे पार्थिव नेर येथील वैद्यकीय दवाखान्यामध्ये नेण्यात आले असुन,रिपोर्ट येणे बाकी आहे.त्यांच्या पाश्चात दोन मुले,सून,नातवंडे असा परिवार आहे.कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती पाहेगाव येथील ग्रामस्थांनी दिली आहे.








