अंबड,प्रतिनिधी
शासकीय कर्मचारी सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच विकासाप्रती कर्तव्यदक्ष असणे गरजेचे असते. परंतु उपविभागीय जलसंधारण विभाग अंबड येथील कनिष्ठ अभियंत्याने आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचा प्रकार मुख्याधिकारी वर्षा मीना यांनी केलेल्या चौकशीतून समोर आल्याने सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता एस पी आटोळे यांच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
अंबड येथील सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब खरात यांनी उपविभागीय जलसंधारण विभाग अंबड येथे कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता एस पी आटोळे यांची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने त्यानी कामचुकार पणा केल्याचे निदर्शनास आल्याने ते दोषी आढळून आल्याचे अहवालात म्हंटले आहे. तसेच हजेरीपटावर स्वाक्षरी करण्याव्यतिरिक्त आटोळे यांनी कसलेही प्रकारचे कार्य केले नसल्याचे चौकशी समितीने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. त्यात ते दोषी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नागरी सेवा नियमानुसार कनिष्ठ अभियंता एस पी आटोळे यांच्यावर सेवानिवृत्ती वेतनातून दंडाची रक्कम वसूल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिला आहेत.
मी मागील कित्येक वर्षानपासून संबंधित अधिकाऱ्यांच्या मनमानी प्रकाराबद्दल प्रशासनाला वेळोवेळी कळविले आहे. त्यांना भरमसाठ पगार असताना सुद्धा उदासीन कर्तव्य शून्यता असणाऱ्या अशा अधिकाऱ्यावर झालेल्या कार्यवाहीमुळे नक्कीच चपराक बसणार आहे.
- बाबासाहेब खरात
सामाजिक कार्यकर्ते,अंबड








