मंठा : श्रीकृष्ण पवार
तालुक्यातील हानवतखेडा येथील शुभम भीमराव खंदारे हे मुंबई या ठिकाणी पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी करिता [ता.१४] मार्च मंगळवार या दिवशी गेले होते . मैदानी चाचणी पूर्ण करून भिमराव व मुलगा शुभम देवगिरी एक्सप्रेसने घरी परत येत असताना शुभमची मूळ कागदपत्रे असलेली बॅग व मोबाईल गाडीतून पडले.याबाबत त्यांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क केला . दरम्यान कसारा स्टेशन येथील रेल्वे पोलीस कर्मचारी रवी गोसावी व जीआरपी नवनाथ हाडपे यांना तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना या भागातील कर्मचाऱ्यांना दिली . त्यांनी सदर बॅग शोधून मूळ कागदपत्रे व दहा हजार रुपयांच्या वस्तुंसह शुभम यास परत केली.या बद्दल भीमराव खंदारे व शुभम खंदारे यांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानले .








