बदनापूर / आदिल खान
महेश नवमी निमित्त बदनापूर शहरातील माहेश्वरी समाजच्या वतीने मोटार सायकल रॅली काढण्यात आली या रॅली मध्ये माहेश्वरी समाज बांधवांची मोठया संख्येने उपस्थिती होती मोटार सायकल रॅली दरम्यान बदनापूर पोलिस पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता,
भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने माहेश्वरी समाजाचा जन्म झाला अशी धार्मिक श्रद्धा आहे. अशा परिस्थितीत माहेश्वरी समाजासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. महेश हे भगवान शिवाचे नाव देखील आहे आणि या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची विधिवत पूजा केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात अशी मान्यता आहे. आज 29 मे 2023, सोमवार रोजी महेश नवमी सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. यंदा सोमवारी महेश नवमी आल्याने त्याचे महत्त्व द्विगुणित झाले आहे. अशा वेळी शिवाची आराधना केल्याने भक्तांच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात. माहेश्वरी समाजातील लोकं हा दिवस थाटामाटात साजरा करतात.
दरम्यान बदनापूर शहरात महेश नवमी निमित्ताने भव्य मोटासायकल रॅली काढण्यात आली यावेळी पोलिसांचा बंदोबस्त होता व
या रॅलीत सर्व माहेश्वरी समाज बांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते









