बदनापूर / आदिल खान
मांडवा ता. बदनापूर जिल्हा जालना येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. दिनांक ३० मे रोजी या पुतळ्याचे अनावरण बदनापूर विधानसभेचे आमदार नारायण कूचे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाले.
यावेळी भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष गणेश कोल्हे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकऱ्यांची मोठी उपस्थिती होती









