दाभाडी / जुल्फेकार बागवान
शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय दाभाडी तालुका बदनापूर जिल्हा जालना या शाळेमध्ये मिश्रा सरांचा सेवा गौरव सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात प्रथम सरस्वती पूजनाने करण्यात आली. सर्वांचे स्वागत स्वागत गीताने केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रवीण निकम यांनी केले.मिश्रा सर शाळेशी अत्यंत प्रामाणिक, मनमिळाऊ होते सरांचा संपूर्ण परिचय देत यापुढेही मिश्रा सरांचे मार्गदर्शन शाळेला मिळेल, कोणतीही जबाबदारी यशस्वीरिते पार पाडणारे होते. असे त्यांनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये सांगितले श्री. एस जी मिश्रा सर हे नियत वयोमानानुसार दिनांक 30. 09.2023 रोजी प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झालेले आहेत. म्हणून त्यांच्या सेवा गौरव दिनानिमित्त यथोचित असा सपत्नीक सत्कार शाळेच्या व संस्थेच्या वतीने करण्यात आला. त्याप्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोकराव निकम हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव बसंतीलाल गोलेच्छा, सहसचिव पांडुरंगनाना जैवाळ, संचालक अरुण शेठ महाजन ,शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष शिवाजीराव बकाल, जिल्हा परिषद प्रशाला शिवनगर चे अध्यक्ष संदीप पांडे ,उपसरपंच कैलासराव बकाल ग्रामपंचायत सदस्य जुलफेकार बागवान ,माजी उपाध्यक्ष धोंडीराम बकाल ,ठाकूर सर, ओळेकर सर, सोमीनाथराव कान्हेरे ,मिश्रा सर यांचे जावई मोहित दुबे ,मुलगा शुभम मिश्रा, मुली कोमल मिश्रा, काजल मिश्रा, पत्नी सौ. बबीता मिश्रा यांची उपस्थिती होती. सेवानिवृत्तीमुळे शाळेमध्ये सर्व विद्यार्थी व कर्मचारी भाऊक झालेले होते. एस जी मिश्रा सरांना सेवा गौरव दिनानिमित्त व पुढील आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या. शाळेचे सहशिक्षक साळवे बी आर यांनी सेवानिवृत्ती निमित्त एक गीत सादर केले. सहशिक्षक जाधव वाय व्ही यांनी आपल्या मनोगत मध्ये सांगितले की शाळेचे जेष्ठ शिक्षक सेवानिवृत्त झाल्यामुळे आम्हाला नक्कीच पोरक झाल्यासारखं वाटतंय. अनेक विद्यार्थ्यांनी सरांच्या सेवा निवृत्ती निमित्त आपल्या मनोगता मध्ये भावना प्रकट केल्या. तसेच शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोकराव निकम त्यांनी अध्यक्षीय समारोपामध्ये सांगितले की, मिश्रा सरांची ज्यावेळेस शाळेला गरज असेल तेव्हा मिश्रा सर शाळेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येतील. मिश्रा सरांच्या खूप रजा शिल्लक असतानाही त्यांनी शाळेचे विद्यार्थ्यांसाठी रजा घेतल्या नाहीत. मिश्रा सरांची धाकटी मुलगी काजल शामसुंदर मिश्रा हिने आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना सांगितले की, मी सुद्धा या शाळेमुळे घडले आहे. माझी सर्व बेसिक तयारी या शाळेमुळेच झाली आहे. मला या शाळेबद्दल अभिमान आहे, आणि यापुढेही राहील. कंचलवाड आर.व्ही. यांनी हा कार्यक्रम संगीतमय केला. या कार्यक्रमासाठी उत्कृष्ट सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक एडके ए.जे. यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाळेचे पर्यवेक्षक गायकवाड बि.आर. यांनी केले. शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आदि नी सुद्धा मिश्रा सरांना यांना सेवा गौरव सोहळ्यानिमित्त आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय दाभाडी चे सर्व शिक्षकवंद व शिक्षिकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.









