मंठा / श्रीकृष्ण पवार
काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेतील प्रतोद आमदार राजेश राठोड यांची तेलंगाना राज्य मध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी वरंगल जिल्ह्यातील पालाकृती विधानसभा क्षेत्र निरीक्षक पदी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय मलिकार्जुन जी खर्गे साहेब यांच्या आदेशाने तेलंगाना राज्य प्रभारी माणिकरावजी ठाकरे साहेब यांनी आमदार राजेश राठोड यांची नियुक्ती केली आहे बंजारा समाज हा अतिशय मोठ्या प्रमाणात आहे कर्नाटक छत्तीसगड हरियाणा राजस्थान येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार राजेश राठोड यांनी विशेष कार्य केल्याची दखल घेऊन त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे गांधी घराण्याची अत्यंत विश्वासू म्हणून आमदार राठोड यांची एक वेगळी ओळख आहे आमदार राठोड यांच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे स्वागत होत आहे









